NH-16 Accident Today 
देश विदेश

Accident : महामार्गावर अपघाताचा थरार, कार आणि ट्रकची जोरात धडक, चौघांचा जागीच मृत्यू

Visakhapatnam accident : विशाखापट्टणमजवळील आनंदपुरम येथे राष्ट्रीय महामार्ग-१६ वर भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

Namdeo Kumbhar

NH-16 Accident Today : भरधाव कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विशाखापट्टणम येथे घडली आहे. हा अपघात आनंदपुरम येथील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी झाला. प्राथमिक अंदाजानुसार, चालकाला लागलेली डुलकी आल्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अपघातातील सर्व मृत आणि जखमी व्यक्ती गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गंभीर जखमी झालेल्या एका प्रवाशाला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशाखापट्टणम जवळील आनंदपुरम येथे राष्ट्रीय महामार्ग-१६ वर रविवारी सकाळी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. गुंटूर जिल्ह्यातील पाच जण कारने श्रीकाकुलमच्या दिशेने जात असताना, आनंदपुरम जवळील सत्तरवू जंक्शन येथे त्यांच्या भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिसांनी सांगितले की, गुंटूरच्या नरसारावपेटा येथून श्रीकाकुलमच्या दिशेने जाणारी कार भरधाव वेगाने असलेल्या ट्रकला जोरात धडकली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमी हे गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी होते. मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे पटलेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच आनंदपुरम पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले. घटनास्थळावर पंचनामा करत पोलिसांनी मृतांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. या जीवघेण्या रस्ते अपघातामागे अतिवेग आणि झोपेसारखी नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. सया प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent Heart Attack: या 6 व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

Maharashtra News Live Update: भिमाशंकरच्या दुरवस्थेवर सुप्रिया सुळेंची टीका; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT