Buddhadeb Bhattacharjee Death | पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे कोलकाता येथे निधन झाले. SAAM TV
देश विदेश

Buddhadeb Bhattacharjee | बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन, शिक्षक ते मुख्यमंत्री...असा होता त्यांचा राजकीय प्रवास

Buddhadeb Bhattacharjee Death : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि माकपचे माजी ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षांचे होते.

Saam Tv

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांचं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांचे चिरंजीव सुचेतन भट्टाचार्य यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आजारपणामुळं ते सक्रीय राजकारणापासून बराच काळ दूर होते. माकपच्या विविध कार्यक्रमांमध्येही ते सहभागी होत नव्हते.

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री भट्टाचार्य यांचे कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गुरुवारी सकाळी ८.२० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

आजारपणाशी झुंज

भट्टाचार्य हे बऱ्याच दिवसांपासून अंत्यवस्थ होते. त्यांना श्वास घेण्याचा त्रास होता. मागील महिन्यातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृद्धापकाळात त्यांना विविध आजारांनीही ग्रासले होते. कोलकाता येथील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते.

बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सन २००० ते २०११ पर्यंत बंगालचा राज्यकारभार सांभाळला होता. त्यापूर्वी २३ वर्षे ज्योती बसू हे मुख्यमंत्रि‍पदी होते. एकूण ३४ वर्षांच्या डाव्यांच्या सत्ताकाळात बुद्धदेव भट्टाचार्य यांनी महत्वाची भूमिका आणि जबाबदाऱ्या निभावल्या होत्या. माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी भट्टाचार्य यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

बुद्धदेव भट्टाचार्य यांची राजकीय कारकीर्द

बुद्धदेव भट्टाचार्य यांनी २००० ते २०११ अशी दहा वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. प्रॅक्टिकल पॉलिटिक्सला मानणारे बुद्धदेव यांचा तब्बल ३५ वर्षे पश्चिम बंगालच्या राजकारणावर प्रभाव होता. भट्टाचार्य यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता.

१ मार्च १९४४ रोजी बुद्धदेव यांचा जन्म उत्तर कोलकाता येथे झाला. कोलकातामधूनच त्यांचं शिक्षण झालं. प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी बांगला साहित्यातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यांचे आजोबा साहित्याचे जाणकार होते. कोलकातामधून पुजारी दर्पण नावाची प्रसिद्ध पत्रिका प्रकाशित करत होते. पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर बुद्धदेव यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. काही वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात इन्टरेस्ट!

विद्यार्थीदशेपासूनच त्यांना राजकारणात रस होता. १९६८ मध्ये सीपीएमची विद्यार्थी संघटना डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशनच्या राज्य सचिवपदी त्यांची निवड झाली. १९७७ मध्ये कोलकाताच्या काशीपूर-बेलछिया विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. १९८७ मध्ये जादवपूर मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून २०११ पर्यंत त्यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९७७ मध्येच ज्योती बसू यांच्या सरकारमध्ये ते माहिती आणि सांस्कृतिक मंत्री होते.

१९८२ पर्यंत ते याच पदावर होते. १९९६ मध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. २००० मध्ये ज्योती बसू यांनी बंगालची धुरा बुद्धदेव भट्टाचार्य यांच्याकडे सोपवली. २०११ पर्यंत ते राज्याच्या या सर्वोच्च पदावर होते. २०१५ पर्यंत ते राजकारणात सक्रिय होते. त्यानंतर ते राजकारणापासून दूर राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : अजित आगरकरची हक्कालपट्टी? निवड समितीच्या अध्यक्षपदी रवी शास्त्रींची नियुक्ती होणार?

Maharashtra Live News Update: निलेश गायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या "त्या" एजंटची चौकशी होणार

Afternoon Sleep: दुपारची झोप घेणं शरीरासाठी फायदेशीर की घातक? तज्ज्ञांनी नेमका काय सल्ला दिला?

CBSE Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर, कुठे चेक कराल?

Shivajirao Kardile: दूधवाल्याचा पोरगं ते मंत्री, कोण होते भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले?

SCROLL FOR NEXT