narendra modi 
देश विदेश

कल्याण सिंहंच्या स्वप्नांची पुर्तता करणार : पंतप्रधान माेदी

Siddharth Latkar

लखनऊ : कल्याण सिंहजींनी जनकल्याण हा त्यांचा जीवनमंत्र बनवला. त्यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्राच्या विकासासाठी काम केले. ते प्रामाणिकपणा आणि चांगल्या प्रशासनाचे आदर्शवत ठरले आहेत अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना श्रद्धाजंली वाहताना व्यक्त केली.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. आज रविवार लखनऊ येथे त्यांच्या निवासस्थानी देशातील वेगवेगळ्या भागातून नेत्यांसह कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी येताहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदींसह अन्य भाजप नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कल्याण सिंह यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना श्रद्धांजली वाहतना पंतप्रधान माेदी म्हणाले त्यांच्या आई वडिलांनी ठेवलेल्या नावप्रमाणेच ते आयुष्यभर कार्यरत राहिले. त्यांनी आपले आयुष्य ख-या अर्थाने जनतेसाठी समर्पित केले. देशाने एक महत्वाचे व्यक्तिमत्व आणि एक सामर्थ्यवान नेता गमावला आहे. त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करू.

दरम्यान कल्याण सिंह यांना विविध नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान कल्याण सिंह यांच्यावर उद्या सोमवार (ता.२३) अलीगढ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उद्या उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

former-up-cm-kalyan-singh-death-news-live-updates-lucknow-bjp-pm-narrendra-modi-sml80

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT