'...तर राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल'

shalinitai patil
shalinitai patil
Published On

सातारा : चिमणगाव (ता. काेरेगाव) येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची jarendeshwar sugar factory वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच झाली. या सभेत कारखान्याच्या अध्यक्षा डाॅ. शालिनीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नऊ ठरावांना सर्वांनुमते मान्यता देण्यात आली. या सभेत शालिनीताईंनी shalinitai patil शेतक-यांना ऊसाचा चांगला दर देण्याचे निश्चित करुन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांचे नाव घेता खरमरीत टीका केली.

दाेन वर्षानंतर सभेस उपस्थित राहिलेल्या शालिनीताई साम टीव्हीशी बाेलताना म्हणाल्या जरंडेश्वर सहकारी कारखाना हा न्यायालयाच्या आदेशाने ईडीने enforcement directorate ताब्यात घेतला आहे. डिसेंबर महिन्यात गाळप सुरु करावे लागणार आहे. त्यासाठी या कारखान्याबाबत ईडीशी बाेलून काही तरी नियाेजन करणे आवश्यक हाेते. त्यासाठी सभेचे आयाेजन करण्यात आले.

shalinitai patil
जिल्हाध्यक्षाच्या वाहनावर दगडफेक; अजित पवारांच्या नात्यातील युवक

काेरेगाव तालुक्यात १० लक्ष टन ऊस आहे. त्याचे गाळप झाले पाहिजे. शेतक-यांना याेग्य दर दिला पाहिजे. त्यासाठी तातडीने कार्यवाही झाली पाहिजे. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी सभा झाली. या सभेत काही महत्वपुर्ण चर्चा झाल्याचे शालिनीताई पाटील यांनी सांगितले.

दरम्यान जे राज्यात चालले आहे. त्याची दखल भारत सरकारने घ्यावी. देशाच्या सहकार खात्याने घ्यावी. प्रामुख्याने शिखर बॅंकेच्या २५ हजार काेटींच्या घाेटाळ्यात जे अपराधी ठरले आहेत. ज्यांची प्रतिमा ढागळली आहे त्यांना काेणत्याही प्रकारची निवडणुक लढविण्यास प्रतिबंध करावा हे या देशाच्या गृहमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यावे यासाठी सभेची आवश्यकता हाेती. त्यानूसार आम्ही वकिलांशी चर्चा करीत आहाेत असेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील या घोटाळ्यांची पुन्हा चौकशी झाल्यास राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल. हे सरकार पडले आणि पुन्हा रामराज्य येईल असेही वक्तव्य शालिनीताईंनी सभेत केल्याने जरंडेश्वरच्या निमित्ताने काेरेगावसह जिल्ह्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com