Former Prime Minister Shinzo, Ex-Japan PM Shot Live News, Shinzo Abe News, Former Japan PM, Latest Marathi News  Saam Tv
देश विदेश

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला; भाषणादरम्यान गोळी झाडली

जपानी पोलिसांनी सध्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

वृत्तसंस्था

Shinzo Abe Shoot: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर आज हल्ला आल्याची माहिती समोर आली आहे. भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. शिंजो आबे यांच्या छातीजवळ गोळी लागली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या आबे यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने शिंजो आबे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. जपानी पोलिसांनी (Police) सध्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण करत असताना मागून एका व्यक्तीने हल्ला केला. शिंजो आबे अचानक पडल्यामुळे तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही. मात्र यादरम्यान काही लोकांनी तेथे गोळीबार केल्यासारखे काहीसे आवाज ऐकू आले. हल्लेखोरांनं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. (Ex-Japan PM Shinzo Abe Shot Live News)

जपानमध्ये रविवारी वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंगे आबे तेथे प्रचार करत होते. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे वय 41 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहेहल्ल्यानंतरचे काही व्हिडिओही समोर येऊ लागले आहेत. यामध्ये चेंगराचेंगरीची स्थिती तेथे स्पष्टपणे दिसून येत आहे.

शिंजो आबे यांनी 2020 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. प्रकृती खालावल्याने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ते जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहेत. गेल्या वर्षी भारताने शिंजो आबे यांना पद्मविभूषण देऊन गौरविले होते. भारताशी संबंध चांगले करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. (Shinzo Abe Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

Malavya Rajyog 2026: एका वर्षानंतर शुक्र बनवणार मालव्य राजयोग; या तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

MNS-Shivsena: ठाकरेंचे मुंबईत किती नगरसेवक?, शिवसेना-मनसेच्या विजयी शिलेदारांची यादी वाचा एका क्लिकवर

Raj Thackeray reaction : काय चुकलं? पराभवानंतर राज ठाकरे निराश, व्यक्त केले दु:ख; म्हणाले, दोन्ही...

Shani Mantras For Success In Job: नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवीये? शनिदेवाच्या 'या' मंत्राचा करा जप

SCROLL FOR NEXT