Chennamma Gowda, wife of former Prime Minister H.D. Deve Gowda, passes away in Bengaluru after cardiac arrest. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! माजी पंतप्रधानांच्या पत्नीचे निधन; राजकीय वर्तुळात हळहळ

Former PM Deve Gowda Wife Death Reason Cardiac Arrest: माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांचे बेंगळुरूमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त.

Omkar Sonawane

माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नमा यांचे शनिवारी (दि,18 जुलै) बेगळुरूतील खासगी रुग्णालयात निधन झाले. संध्याकाळी सुमारे 4 वाजता त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बुधवारी 16 जुलैला त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच छातीत जडपणा जाणवत होता. त्यानंतर त्यांनी बेंगळूर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना सुरुवातीला प्रकृतीत सुधारणा दिसत होती. मात्र शनिवारी सायंकाळी अचानक त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तपासणीदरम्यान कोणतीही हालचाल दिसून न आल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

1954 मध्ये झाला होता विवाह

चेन्नम्मा यांचा एच. डी. देवेगौडा यांच्याशी 1954 साली विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात चार मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पुत्र आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी तसेच आमदार एच. डी. रेवन्ना यांचा त्यात समावेश आहे. फेब्रुवारी 2001 मध्ये झालेल्या अॅसिड हल्ल्यातून चेन्नम्मा थोडक्यात बचावल्या होत्या. हा हल्ला कौटुंबिक वादातून झाल्याचे सांगितले जाते.

प्रसिद्ध राजकारण्यांची पत्नी आणि आई असूनही चेन्नम्मा नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. एच. डी. देवेगौडा यांनी अनेकदा त्यांच्या त्याग, कुटुंबासाठी केलेल्या योगदानाची आणि पाठींब्याची सार्वजनिकपणे दखल घेतली होती. तसेच एच. डी. कुमारस्वामी यांनीही आपल्या आईच्या संस्कारांमुळेच त्यांच्या राजकीय प्रवासाला दिशा मिळाल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागला, नागपूर ते मुंबई प्रवासासाठी मोजावे लागणार २२,८०० रुपये

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT