madhya pradesh Saam tv
देश विदेश

नेता अन् तरुणी बेडवर नको त्या अवस्थेत, अश्लील व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

madhya pradesh viral video : मध्य प्रदेशातील नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पंचायत समितीच्या माजी नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

नेत्याला अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

मध्य प्रदेशच्या रीवामधील एका नेत्याचा अश्लील व्हिडिओ समोर आला आहे. पंचायत समितीचा माजी नेते विनोद मिश्रा यांचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमधील नेता आणि तरुणी नको त्या अवस्थेत दिसत आहेत. या नेत्याच्या कृत्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

काही जण हनी ट्रॅप असल्याचा दावा करत आहे. दोघांच्या वयामध्ये बरंच अंतर दिसून येत आहे. नेत्याने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप आमदार प्रदीप पटेल यांनी म्हटलं आहे की, विनोद मिश्रा हे श्रीनिवास तिवारी यांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. ते काँग्रेसचे नेते आहेत. तर सिद्धार्थ तिवारी भाजपमध्ये आहेत.

प्रदीप पटेल यांनी पुढे म्हटलं की, 'जमिनीशी संबंधित प्रकरणात या नेत्याने मदत मागितली होती. माझ्या माहितीनुसार, त्यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. या प्रकरणात विनोद मिश्रा यांना अडकवण्याचा प्रयत्न असू शकतो. व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे'.

काँग्रेस नेत्याने सांगितलं की, 'नेता भाजप आमदाराच्या जवळचा व्यक्ती आहे. तो नेता भाजप आमदार प्रदीप पटेल यांचा खास माणूस आहे. त्याचे भाजपशी संबंध आहेत'. तत्पूर्वी, या प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओमधील नेता कोणत्या पक्षाचा आहे, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे संम्रभ कायम आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून नेत्यावर काय कारवाई केली जाते, पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत अर्ध्या तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात

Wedding Invitation : लग्न ठरलंय? मग आधी ही बातमी वाचा! लग्नपत्रिकेबाबत सरकारचा मोठा निर्णय; एका चुकीमुळे बसेल फटका

Video: 'वाचन करताना चूक घडली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो'; राहुल नार्वेकरांची मराठी वाचन चुकांवर सभागृहात माफी

Pune : पुणे हादरलं! दारू प्यायला बसले अन् वाद झाला; तिघांनी मिळून केली मित्राची हत्या

Agra Fort : आग्रा किल्ला हा 'लाल किल्ला' या नावाने का ओळखला जातो?

SCROLL FOR NEXT