Agra Fort : आग्रा किल्ला हा 'लाल किल्ला' या नावाने का ओळखला जातो?

Shreya Maskar

उत्तर प्रदेश

आग्रा किल्ला भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा शहरात यमुना नदीच्या उजव्या तीरावर आहे. हे ताजमहालच्या वायव्येस फक्त 2.5 किमी अंतरावर आहे.

Uttar Pradesh | pinterest

आग्रा किल्ला

आग्रा किल्ल्याला 'लाल किल्ला' किंवा 'किला-ए-अकबरी' (Qila-i-Akbari) असेही म्हटले जाते. आग्रा किल्ला उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आहे.

Agra Fort | pinterest

जागतिक वारसा स्थळ

आग्रा किल्ला १६ व्या शतकातील एक भव्य मुघल किल्ला आहे. आग्रा किल्ला हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.

World Heritage Site | pinterest

किल्ला कोणी बांधला?

आग्रा किल्ला मुघल सम्राट अकबराने बनवला होता. लाल सँडस्टोनच्या भव्य किल्ल्यावरील बांधकाम 1565 मध्ये सुरू झाले आणि 1573 पर्यंत पूर्ण झाले.

Who built the fort? | pinterest

लाल किल्ला

सम्राट अकबराने किल्ल्याच्या बांधकामात वापरलेल्या गडद लाल वालुकाश्मामुळे किल्ल्याला 'लाल किल्ला' असे नाव पडले.

Red Fort | pinterest

किला-ए-अकबरी

मुघल सम्राट अकबर ज्याने किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात केली, तेव्हा त्याच्या नावावरून 'किला-ए-अकबरी' हे नाव पडले.

Qila-i-Akbari | pinterest

जुने नाव काय?

आग्रा किल्ल्याचे मूळ नाव 'बादलगड' असे होते. १६ व्या शतकात मुघल सम्राट अकबराने या वास्तूची पुनर्बांधणी करण्यापूर्वी, येथे विटांचा बनलेला एक जुना किल्ला होता जो राजपूत शासक राजा बादल सिंग यांच्या नियंत्रणाखाली होता.

What was its old name? | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : विंचवाच्या शेपटीसारखा दिसणारा कडा, लोणावळ्यातील 'हे' ठिकाण पाहिल्यावर निसर्गाच्या किमयेवर विश्वास बसेल

Lonavala Tourism | saam tv
येथे क्लिक करा...