माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश; गोव्यात राजकीय डावपेचांना वेग! अनिल पाटील
देश विदेश

माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश; गोव्यात राजकीय डावपेचांना वेग!

आवेर्तान फुर्तादो हे मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्ये मंत्री होते.

अनिल पाटील

गोवा : विधानसभा निवडणुकीच्या Assembly elections पार्श्वभूमीवर गोव्यात आयाराम गयाराम ला सुरुवात झाली आहे. काल काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Former Congress state president आणि मुख्यमंत्री लुईझीन फालेरो CM Luisin Falero यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने नवी चाल खेळत त्यांना टक्कर देण्यासाठी फालेरो यांच्या नावेली मतदारसंघाचे माजी आमदार आवेर्तीनो फूर्तादो Former MLA Avertino Furtado यांना पक्षात घेतले आहे. पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडूराव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे स्वागत केले. (Former Minister Avertan Furtado joins Congress)

हे देखील पहा -

गोव्याचे माजी मंत्री व नावेलीचे माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 2012 मध्ये ते अपक्ष म्‍हणून निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांनी काल कॉंग्रेस पक्षासह आमदारकीचाही राजिनामा दिल्यानंतर नावेलीत कॉंग्रेसला उमेदवार हवा होता व फुर्तादोच्या रुपात त्यांना मजबूत उमेदवार मिळाला.

आज पणजी येथील कॉंग्रेस कार्यालयात Congressional office आपल्या समर्थकासह फुर्तादो यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव Dinesh Gundurao, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधीपक्षनेते दिगंबर कामत, दक्षिण गोवा अध्यक्ष जो डायस. उपाध्यक्ष आल्तीन गोम्स व आवेर्तान फुर्तादो यांचे समर्थक उपस्थित होते.गोव्याच्या विकासासाठी लोकांना कॉंग्रेसचे सरकार हवे आहे. येत्या निवडणुकीत कॉंग्रेस सत्तेवर येईल व स्थिर सरकार देईल. आवेर्तान फुर्तादोच्या रुपाने कॉंग्रेसला युवा नेता मिळाला आहे. असे प्रतिपादन दिनेश गुंडूराव यांनी केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Shaving : फेस शेविंगमुळे मुलींच्या चेहऱ्यावर केस जाड येतात? डर्मेटोलॉजिस्ट काय सांगतात?

Marathi Suspense Thriller : सतीश राजवाडे पुन्हा एकदा 'इन्स्पेक्टर घारगे'च्या भूमिकेत; 'अ परफेक्ट मर्डर'ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

Ice Bath Benefits: बर्फाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे 5 जबरदस्त फायदे, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल

Kidney stones home remedy: रस्त्याच्या कडेला उगवणारं हे छोटं रोप करेल किडनी स्टोनचा खात्मा; 7 दिवसात मिळेल रिझल्ट

Maharashtra News Live Update : ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मोठी घडामोड; माजी महापौरांच्या पतीची चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT