झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे ८१ व्या वर्षी निधन.
दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
झारखंड मुक्ति मोर्चाचे संस्थापक व आदिवासी हक्कांचे प्रवक्ते.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
Shibu Soren passes away : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ति मोर्चा (JMM) चे संस्थापक संरक्षक शिबू सोरेन यांचे आज सकाळी (सोमवार, ४ ऑगस्ट २०२५) निधन झाले. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या ८१व्या वर्षी शिबू सोरेन यांनी अखेरचा श्वास घेतला. शिबू सोरेन गेल्या काही काळापासून किडनीच्या संबंधित आजाराने त्रस्त होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिबू सोरेन यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. (Shibu Soren death news update)
शिबू सोरेन यांचे पुत्र आणि झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर निधनाची माहिती दिली. हेमंत सोरेन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले, “आदरणीय दिशोम गुरुजी आम्हा सर्वांना सोडून गेले. आज मी शून्य झालो आहे.” शिबू सोरेन यांच्या मृत्यूनंतर झारखंडवर शोककळा पसरली आहे. (Former Jharkhand CM Shibu Soren passes away in Delhi)
शिबू सोरेन यांनी झारखंडच्या राजकारणात आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. JMM च्या माध्यमातून त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी आणि झारखंडच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी संघर्ष केला. शिबू सोरेन यांच्या निधनाने झारखंडसह देशभरात शोककळा पसरली आहे.
शिबू सोरेन (जन्म: ११ जानेवारी १९४४ - मृत्यू: ४ ऑगस्ट २०२५) हे झारखंड मुक्ति मोर्चाचे संस्थापक आणि भारतीय राजनेता होते. ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री आणि केंद्रात कोळसा मंत्री राहिले आहेत. दुमका लोकसभा मतदारसंघातून आठ वेळा खासदार आणि तीन वेळा राज्यसभा सदस्य होते. आदिवासी हक्कांसाठी आणि स्वतंत्र झारखंड राज्याच्या चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांना ‘दिशोम गुरु’ म्हणून संबोधले जायचे. दीर्घ आजारानंतर त्यांचे दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात निधन झाले.
शिबू सोरेन कोण होते?
शिबू सोरेन हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री व झारखंड मुक्ति मोर्चाचे संस्थापक होते.
शिबू सोरेन यांचे निधन कधी झाले?
शिबू सोरेन यांचे निधन ४ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात झाले.
शिबू सोरेन कोणत्या आजाराने त्रस्त होते?
शिबू सोरेन किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि काही काळापासून रुग्णालयात उपचार घेत होते.
शिबू सोरेन यांचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?
शिबू सोरेन यांचा जन्म ११ जानेवारी १९४४ रोजी झाला आणि ४ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
शिबू सोरेन किती वेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिले?
शिबू सोरेन तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री होते: २००५ (१० दिवस), २००८-०९ आणि २००९-१०.
शिबू सोरेन यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?
शिबू सोरेन यांनी १९७२ मध्ये झारखंड मुक्ति मोर्चा (JMM) ची स्थापना केली.
शिबू सोरेन किती वेळा खासदार राहिले आहेत?
शिबू सोरेन आठ वेळा दुमका लोकसभा मतदारसंघातून खासदार आणि दोन वेळा राज्यसभा सदस्य होते.
शिबू सोरेन यांना झारखंडमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जायचं?
शिबू सोरेन यांना 'दिशोम गुरु' आणि 'झारखंडचे वाघ' असे संबोधले जायचे.
झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
हेमंत सोरेन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.