Hemant Soren Arrested By ED Saam tv
देश विदेश

Hemant Soren Arrested By ED: मोठी बातमी! हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक

Hemant Soren Arrested By ED: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अटक करण्यात आली आहे. या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप, नवी दिल्ली

Hemant Soren Latest News :

झारखंडमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अटक करण्यात आली आहे. सोरेन यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आज मंगळवार दुपारी १ वाजल्यापासून हेमंत सोरेन यांची चौकशी सुरु होती. सोरेन यांना अटक केल्यानंतर त्यांना गुरुवारी सकाळी १० वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडच्या दीन दयाळ नगर येथे हेमंत सोरेन यांच्यासाठी तुरुंग बनवलं आहे. याच तुरुंगात हेमंत सोरेन यांना ठेवण्यात येणार आहे. सध्या हेमंत सोरेन यांना भेटण्यासाठी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन ईडी कार्यालयात गेल्या आहेत.

हेमंत सोरेन यांना अटक का झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांची रांचीतील बडगाईतील ८.४६ एकर जमीन खरेदी प्रकरणी चौकशी केली. ही जमीन १२ प्लॉटमध्ये विभागली गेली आहे. या जमीनीवर एक लहान आऊट हाऊस आहे. तर एक गार्ड रुम आहे. १२ प्लॉट हे वेगवेगळ्या लोकांच्या नावावर आहेत. मात्र, सर्व १२ प्लॉट सोरेन यांचे आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. याच कथित जमीन घोटाळा प्रकरणी सोरेन यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांकडूनच मतदार यादीत घोळ; अंबादास दानवेंचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Blast: भयंकर स्फोटाने उत्तर प्रदेश हादरले, दोघांचा मृत्यू; भीषण आग अन् धुराचे लोट

'तेरी गाड़ी को हम ब्लास्ट करेंगे! सनातन संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बॉम्बने उडवण्याची धमकी

शरद पवारांना पत्र लिहिणारा अकोल्यातील तरूण समोर.. तो म्हणतो, साहेबच माझं लग्न करून देतील|VIDEO

Bigg Boss 19: मृदुल तिवारीला बाहेर काढण्यासाठी रचला कट; बिग बॉस १९ मध्ये प्रेक्षक म्हणून प्रवेश आलेल्या व्यक्तीचा दावा

SCROLL FOR NEXT