देश विदेश

गुजरातच्या राजकारण्यांविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला; माजी IPS अधिकाऱ्याचा दाव्यानं खळबळ

MCI Corruption Case: माजी आयपीएस अधिकारी संजय कुमार सिंग यांनी २०१० मधील एमसीआय भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासादरम्यान गुजरातमधील वरिष्ठ नेत्यांविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केला आहे. नेमकं प्रकरण काय?

Bharat Jadhav

भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणावरून माजी आयपीएस अधिकाऱ्याने केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात एमसीआयशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करताना तत्कालीन सीबीआय संचालकांनी गुजरातमधील वरिष्ठ राजकीय नेत्यांविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी संजय कुमार सिंग यांनी केला आहे. मात्र, ठोस पुरावे नसताना अशा सूचना मान्य करण्यास आपण नकार दिला होता, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आता नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

माजी आयपीएस अधिकारी संजय कुमार सिंग यांनी रविवारी असा आरोप केला की, २०१० मध्ये 'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया' (एमसीआय) शी संबंधित एका भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासादरम्यान, तत्कालीन सीबीआय संचालकांनी त्यांना गुजरातच्या वरिष्ठ राजकीय नेत्यांविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी दबाव आणला गेला होता. वृत्तसंस्था एएनआय (ANI) शी बोलताना, माजी आयपीएस (IPS) अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी या सूचनांचे पालन करण्यास नकार दिला, कारण राजकीय नेत्यांविरुद्ध तपास सुरू करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नव्हता.

परंतु नेत्यांची पुराव्याविना चौकशी करण्यात आली होती. संजय कुमार सिंग यांनी सीबीआय (CBI) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सोबतही काम केलंय. या घटनेची आठवण सांगताना सिंग यांनी सांगितलं की, एमसीआय (MCI) च्या अध्यक्षांविरुद्ध सीबीआय तपास करत असताना ही बाब समोर आली होती. यात त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचाही समावेश होता.

एमसीआय (MCI) अध्यक्षांशी संबंधित प्रकरण

त्यांनी सांगितले की, २०१० मध्ये एमसीआय अध्यक्षांविरुद्ध एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रक्रियेदरम्यान, त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटकडे असलेली कागदपत्रे मिळवून, त्यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जावी, अशी चर्चा झाली होती.

त्यांनी सांगितले की, तपासाबाबतच्या चर्चेदरम्यान तत्कालीन सीबीआय संचालकांनी त्यांना गुजरातमधील काही वरिष्ठ राजकारण्यांविरुद्ध पुरावे गोळा करण्यास सांगण्यात आले. हे प्रकरण एका चार्टर्ड अकाउंटंटच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित होते. संचालकांनी त्यांना म्हटलं, "तुम्ही अहमदाबादमध्ये त्या चार्टर्ड अकाउंटंटविरुद्ध गुन्हा नोंदवत आहात, तर त्याच वेळी गुजरातमधील काही वरिष्ठ राजकारण्यांविरुद्धही पुरावे गोळा करावेत.

कोणताही ठोस पुरावा नव्हता

मात्र माजी आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रस्तावित चौकशीचा संबंधित प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता आणि त्या राजकीय नेत्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी तपास संस्थेकडे कोणताही ठोस पुरावे नव्हते. " आपण त्याबाबत वरिष्ठांनाही सांगितले की, या प्रकरणाचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. दुसरे म्हणजे, आमच्याकडे असा कोणताही ठोस पुरावा नाही ज्याच्या आधारे पुढील तपास करता येईल. त्यामुळे त्यांना सांगितले की, हे एका 'फिशिंग एक्स्पिडिशन'सारखे ठरेल, म्हणून मी नकार दिल्याचं आयपीएस अधिकारी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फोटोमध्ये फुलपाखरू ससा आणि माकड लपलेले आहेत, १० मिनिटांत शोधून दाखवा

Maharashtra News Live Update: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला आम आदमी पक्षाचा विरोध

Marathwada Yatra: १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांचे देवस्थान, यादवकालीन श्री वैद्यनाथ मंदिर; वर्षात होतात ९ मोठे उत्सव

डिलिमीटेशन विधेयकावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं; शरद पवारांनाही केलं मोठं आवाहन

Indian Railways : आरामदायी बेड, ऑटोमॉटिक डोअर..; वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट एसी डबा पारंपरिक फर्स्ट एसीपेक्षा किती वेगळा?

SCROLL FOR NEXT