उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षात नव्या चेहऱ्यांचा प्रवेशही सुरूच आहे. लखनऊच्या प्रदेश काँग्रेस मुख्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात यूपी कॅडरचे माजी IAS अधिकारी डॉ. राकेश वर्मा आणि साऊथ अभिनेत्री जारा खान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांच्या उपस्थितीत दोघांना पक्षाचं सदस्यत्व देण्यात आलंय. यावेळी इतर काही लोकांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश कॅडरचे 2013 बॅचचे माजी IAS अधिकारी डॉ. राकेश वर्मा यांनी पक्षात प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी 1997 बॅचचे यूपी पीसीएस अधिकारी म्हणूनही काम केले आहे. 2020 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच VRS घेतली. त्यानंतर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर ते एक्टिव्हपणे काम करतायत.
साऊथ अभिनेत्री आणि समाजसेविका जारा खान यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पूर्वी झोनचे प्रभारी हसीब खान यांच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलं. यावेळी यूपी काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी डॉ. राकेश वर्मा आणि जारा खान यांचं पक्षात स्वागत केलंय आणि दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हसीब खान यांनी सांगितलं की, राहुल गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक लोक काँग्रेसशी जोडले जातायत. काँग्रेसचा विस्तार सातत्याने होत असून पक्षाचा जनाधारही वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.
विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नांवर काँग्रेस त्यांच्यासोबत ठामपणे उभी आहे, असंही हसीब खान यांनी सांगितलं. न्यायासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करणारे नागरिक तसंच तक्रार करूनही गुन्हा दाखल न झाल्याने अडचणीत असलेल्या लोकांचा आवाज काँग्रेस पुढेही उठवत राहील, असं त्यांनी म्हटलंय.
हसीब खान यांनी 2029 मध्ये राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील, असा दावा केला. काँग्रेसकडून सातत्याने जनतेशी संबंधित प्रश्नांवर काम केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काळात उत्तर प्रदेशसह देशभरात काँग्रेसचा जनाधार आणखी मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात मोहनलालगंजचे माजी उमेदवार नरेंद्र गौतम यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील अनेक लोकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये विकास चंद्र, राम राजकुमार, सुमित कुमार आणि शैलेंद्र सिंह यांच्यासह इतर लोकांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.