CHAUDHARY PHOOL CHAND MULLANA DIES saam tv
देश विदेश

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, कॅबिनेट मंत्र्यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Chaudhary Phool Chand Mullana Death News Today: हरियाणा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री चौधरी फूलचंद मुलाना यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने हरियाणाच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Omkar Sonawane

हरियाणा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री चौधरी फूलचंद मुलाना यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने हरियाणाच्या राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

चौधरी फूलचंद मुलाना हे हरियाणा काँग्रेसमधे सर्वाधिक काळ प्रदेशाध्यक्षपद सांभाळनारे नेते होते. त्यांनी तब्बल साडेसहा वर्षे पक्षाची धुरा सांभाळली होती. मुलाना विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे पुत्र वरुण चौधरी हे अंबाला लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार आहेत, तर त्यांच्या सून पूजा चौधरी या मुलाना विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. वरुण चौधरी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली.

दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर चौधरी फूलचंद मुलाना हे पंचकुला येथील आपल्या घरी होते. मात्र, शुक्रवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे सकाळी सुमारे 9 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी अंबाला येथे आणण्यात आले आहे.

हरियाणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'एक्स'वर पोस्ट करत त्यांनी म्हटले की, आमचे जवळचे सहकारी, हरियाणा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमच्या काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले चौधरी फूलचंद मुलाना यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला अत्यंत दुःख झाले आहे. चौधरी फूलचंद मुलाना यांच्या निधनाने हरियाणा काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याची कारकीर्द संपुष्टात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: टीव्ही पाहाल तर किडनी गमवाल? लठ्ठपणा, डायबेटीज, ब्लडप्रेशरचाही धोका?

कावळ्याला वाटलं विजय आपलाच! पण शेवटच्या क्षणी गिधाडाने डाव पलटला; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये पाणी चोरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल,300 जणांना नोटिसा!

शेतकरी कर्जमाफीमध्ये मोठी अपडेट! OTS अंतर्गत पहिली यादी जाहीर; 1.69 लाख शेतकऱ्यांना संधी, यादीत तुमचं नाव आहे का?

नागपूरचं नाव दीक्षाभूमी करा, संजय राऊतांची मागणी; काँग्रेसचा पाठिंबा, भाजपची सावध भूमिका

SCROLL FOR NEXT