Tejashwi Yadav during a party meeting amid rising political speculation over Rajya Sabha candidature. Saam Tv
देश विदेश

माजी उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच राज्यसभेत जाणार; महाआघाडीने मोठा डाव टाकला

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव राज्यसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्र राज्यासह देशातील दहा राज्यातील 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त तीनच दिवस उरले आहे. बिहारमधील पाच राज्यसभेच्या जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार, एनडीए (NDA) सहजपणे चार जागा जिंकेल आणि पाचव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्यता आहे. संख्याबळ कमी असूनही, आरजेडीने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करून राजकारणात घडामोडींना वेग आणला आहे.

Tejashwi Yadav contest Rajya Sabha election 2026

बिहारमधील पाच राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत एनडीए सहजपणे चार जागा जिंकेल. मात्र जर विरोधी पक्षांनी मिळून निवडणूक लढवली तर ते एक जागा जिंकू शकते. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी आरजेडीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मात्र केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी एनडीए पाचवी राज्यसभेची जागा जिंकेल असा दावा करून राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आणला आहे. यामुळे प्रश्न ही जागा कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीने राज्यसभा निवडणुकीचा खेळ पूर्णपणे बदलून टाकला आहे. बिहारमधील ज्या पाच राज्यसभेच्या जागांवर निवडणुका होत आहेत, त्यापैकी आरजेडी कोट्यातील दोन राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. RJD स्वतःच्या बळावर राज्यसभेची एकही जागा जिंकण्याच्या स्थितीत नसला तरी, पक्षाच्या बैठकीत राज्यसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री कांती सिंह म्हणाले, आम्ही नक्कीच राज्यसभेची निवडणूक लढवू. त्यामुळे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

बिहारमधील राज्यसभा निवडणुकीत आकड्यांचा खेळ काय आहे?

बिहार विधानसभेत एकूण २४३ आमदार आहेत, त्यापैकी एनडीएकडे सध्या २०२ आहेत, तर महाआघाडीकडे फक्त ३५ आहेत. बिहारमधील एका राज्यसभेच्या जागेसाठी ४१ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे, त्यामुळे एनडीए सहजपणे चार जागा जिंकेल. दोन जागा भाजपला आणि दोन जागा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या (JDU) जेडीयूला मिळतील असे सांगितले जात आहे.

तेजस्वी यादव स्वतः राज्यसभा निवडणूक लढवणार?

RJD च्या घोषणेनंतर, तेजस्वी यादव स्वतः राज्यसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र तेजस्वी यादव यांनी बैठकीत याबाबत कुठलीही सुतोवाच केले नाहीये. पण बैठकीत असलेल्या नेत्यांनी सांगितले की तेजस्वी यादव हे राज्यसभा लढवण्याच्या तयारीत आहे. तेजस्वी म्हणाले की निर्णय घेण्यापूर्वी ते महाआघाडीतील इतर घटकांशी बोलतील. त्यांना एआयएमआयएम AIMIM आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांशीही बोलावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिंताजनक! महाराष्ट्रातील कराडचे २१ पर्यटक दुबईत अडकले; हॉटेलजवळच मोठा स्फोट, टेन्शन वाढलं

Maharashtra Live News Update: कल्याण आधारवाडी जेलमधील २ लाचखोर जेल कर्मचाऱ्यांना बेड्या

Iran–Israel War: कोल्हापुरातील १०० नागरिक दुबईत अडकले, व्हिडिओद्वारे सांगितली परिस्थिती, VIDEO

पश्चिम-आशियामधील युद्ध पेटणार! ओमानमध्ये तेल टँकरवर ड्रोन हल्ला, एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू

Tuesday Horoscope: पैशांचा लाभ, प्रेमात नवा रंग; या राशींसाठी रंगपंचमी ठरेल खास, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT