Rahul Gandhi News Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi News: बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, "ते म्हणतील ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने..."

Political News: ओडिशातील रेल्वे अपघातावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Shivani Tichkule

Rahul Gandhi on Modi Government: ओडिशातील रेल्वे अपघातावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तुम्ही मोदी सरकारला विचारा रेल्वे अपघात का झाला? ते म्हणतील काँग्रेसने हे 50 वर्षांपूर्वी केलं होत. ओडिशात शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

राहुल गांधी (Rahul Gandhi) एका आठवड्याच्या अमेरिका (America) दौऱ्यावर आहेत. ते इथल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. सोमवारी त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील जनतेला संबोधित केले. यावेळी राहुल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांना विचारा की तुम्ही पाठ्यपुस्तकातून पीरियोडिक टेबल का काढला? ते लगेच म्हणतील की काँग्रेसने हे काम 60 वर्षांपूर्वी केलं होत. (Political News)

पुढे राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारला काहीही विचार ते लगेच उत्तर देणार की काँग्रेसने केलं. तुम्ही सर्व कारने इथे आला आहात. कल्पना करा की कार चालवताना तुम्ही फक्त मागील आरशात पाहिले तर काय होईल? तुम्ही गाडी चालवू शकाल का? एकामागून एक अपघात होणार. प्रवासी तुम्हाला विचारतील तुम्ही काय करत आहात? असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर यांच्यावर टीका केली आहे.

"पीएम मोदी मागे वळून कार चालवत आहेत"

राहुल गांधी पुढे म्हणाले, ही पंतप्रधान मोदींची विचारसरणी आहे. त्यांना भारताची गाडी चालवायची आहे, पण ते फक्त मागे वळून पाहतात. गाडी पुढे का सरकत नाही, पुन्हा पुन्हा का धक्के मारत आहे, याचा विचार त्यांना करता येत नाही. ही भाजप (BJP) आणि संघाची विचारसरणी आहे, असं देखील ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR filing: ITR भरण्यासाठी उरले २४ तास; फक्त १० मिनिटांत घरबसल्या रिटर्न भरा, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

ठाण्याच्या विकासाला नवी झळाळी! सिद्धेश्वर तलावाजवळील ५० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारणार ‘ग्रेड A+’ व्यावसायिक प्रकल्प

पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT