Haryana Politics Saam tv
देश विदेश

Haryana Politics : तासाभरापूर्वी भाजप उमेदवाराचा प्रचार; बड्या नेत्याची अचानक काँग्रेसच्या सभेत एन्ट्री, पुढे असं काही घडलं

Vishal Gangurde

हरियाणा : माजी खासदार अशोक तंवर हे ५ वर्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. महेंद्रगडच्या रॅलीत तंवर यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा हात धरला आहे. यावेळी मंचावर भूपिंदर सिंह हुड्डा देखील होते. विशेष म्हणजे अशोक तंवर हे तासाभरापूर्वी भाजप उमेदवाराचा प्रचार करत होते.

अशोक तंवर दुपारी १२ वाजता नलवा येथे भाजप उमेदवार रणधीर परिहार यांचा प्रचार करत होते. या प्रचारादरम्यान, मंचावर भाजपचे दिग्गज नेते कुलदीप बिश्नोई आणि राजस्थानमधील राजेंद्र राठोड देखील होते. यावेळी अशोक तंवर यांनी लोकांना भाजपला निवडून देण्याचं आवाहन केलं. तंवर यांनी जींदमध्ये एका रॅलीमध्ये हजेरी लावली होती. त्यांनी सफीदोंमध्ये राम कुमार गौतम यांच्यासाठी मते मागिती होती.

सिरसामध्ये भाजपने दिली होती उमेदवारी

लोकसभा निवडणुकीत अशोक तंवर यांना भाजपने सिरसा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या कुमारी सैलजा यांनी त्यांना धूळ चारली. अशोक तंवर यांच्या पक्ष प्रवेशाआधी सैलजा यांनी सोनिया गांधी यांना भेटल्या होत्या. सोनिया गांधी आणि सैलजा यांच्या बैठकीत तंवर यांना पक्ष प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. त्यानंतर तंवर हे महेंद्रगडसाठी रवाना झाले.

अशोक तंवर हे २०१९ साली हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्याऐवजी सैलजा यांना पक्षात मोठं स्थान दिलं. त्यानंतर अशोक तंवर यांनी काँग्रेसची साथ सोडून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तंवर त्या पक्षातही जास्त काळ रमले नाही. त्यांनी पुढे भाजपमध्ये प्रवेश केला. तंवर हे लोकसभा निवडणुकीत सिरसा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते. मात्र, त्यांचा पराभव झाला.

आता हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची अशोक तंवर यांची इच्छा होती. मात्र, त्यांना विधानसभेसाठी तिकीट मिळालं नाही. यामुळे ते काँग्रेस प्रवेशाच्या विचारात होते.

तंवर राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जायचे

अशोक तंवर यांचं राजकीय करिअर एनएसएसयूआय या संघटनेपासून सुरु झालं. अशोक तंवर हे एनएसयूआय आणि यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिले आहेत. अशोक तंवर यांची गणना एकेकाळी राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयामध्ये केली जायची. तंवर हे २००९ साली काँग्रेसच्या तिकीटीवर सिरसा लोकसभा मतदारसंघातून जिंकून संसदेत गेले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : महायुतीत एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम?

Railway Employees Bonus 2024: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्राने बोनस केला जाहीर; मिळणार 'इतकी' रक्कम

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

SCROLL FOR NEXT