Sushil Kumar Modi Saam Tv
देश विदेश

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sushil Kumar Modi Death: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. कॅन्सरने त्रस्त असलेल्या सुशील मोदी यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये डॉ. अमलेश सेठ यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू होते.

Satish Kengar

Sushil Kumar Modi Death:

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. कॅन्सरने त्रस्त असलेल्या सुशील मोदी यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये डॉ. अमलेश सेठ यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू होते. आज रात्री 9.45 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुशील मोदी यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सुशील मोदी यांच्या निधनाबद्दल बिहारचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी शोक व्यक्त केला आहे. आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांनीही सुशील मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मागच्या महिन्यात म्हणजेच 3 एप्रिल 2024 रोजी स्वत: सुशील मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करताना लिहिले होते की, ते गेल्या 6 महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. आता मला वाटले की, लोकांना सांगायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. सर्व काही पंतप्रधानांना सांगितले आहे. देश, बिहार आणि पक्षासाठी सदैव समर्पित आणि कृतज्ञ राहील.

दरम्यान, सुशील मोदी यांचे राज्यसभेचे सदस्यत्व यावर्षी संपले. भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभेचा खासदार न बनवल्याने त्यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू झाली. गेल्या काही महिन्यांपासून ते सार्वजनिक व्यासपीठावरही दिसले नव्हते. भाजप त्यांना उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यांच्या पोस्टनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

कोण आहेत सुशील कुमार मोदी? (Who Is Sushil Kumar Modi)

सुशील कुमार मोदी यांनी पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीतून राजकारणात प्रवेश केला होता. जेव्हा ते सरचिटणीस म्हणून निवडून आले तेव्हा त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी लालू प्रसाद यादव यांनी अध्यक्षपद जिंकले. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या हाकेवर सुशील मोदींनी आंदोलनात उडी घेतली आणि अटक झाल्यानंतर 19 महिने ते तुरुंगात राहिले. इंदिरा गांधी सरकारने आणलेल्या मिसा कायद्याला मोदींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते आणि त्यातील एक जाचक कलम हटवण्यात ते यशस्वी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT