Bhupen Kumar Borah announces his resignation from the Congress party during a press interaction in Guwahati Saam Tv
देश विदेश

काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Bhupen Borah Resignation Before Assam Assembly Elections: आसाम काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भुपेन कुमार बोरा यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

पुढील काही दिवसात आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आसामचे काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष भुपेन कुमार बोरा यांनी सकाळी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना पाठवला आहे.

गुवाहाटी येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले मी आज सकाळी 8 वाजता काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. तसेच हायकमांडची प्रतिक्रिया येण्याची मी वाट बघेल असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, काँग्रेससोबत 32 वर्षे काम केले पण सध्याच्या राजकीय परिस्थितिमुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. ऑगस्ट 2021 मध्ये काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवले होते. ज्यावेळी भाजप दुसऱ्यांदा आसाममध्ये मोठ्या बहुमताने निवडून आली होती. त्यानंतर 2024 मध्ये त्यांच्याकडील हा पदभार काढून खासदार गोगई यांना प्रदेशाध्यक्षपद सोपवले होते.

मार्च किंवा एप्रिल महिन्यात आसामच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्यापतरी निवडणूक आयोगाने अधिकृत तारीख जाहीर केली नाहीये. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भुपेन बोरा यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते भुपेन बोरा यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री हिमंत बिसवा शर्मा यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. बोराह यांचा राजीनामा अनपेक्षित नव्हता, असा दावा शर्मा यांनी केला. शर्मा म्हणाले की, बोराह यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवण्यात आलं तेव्हाच काँग्रेसमधील त्यांची स्थिती कमकुवत झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

पक्षात त्यांना दुय्यम स्थान दिलं जात होतं, असंही ते म्हणाले. तसेच, जर भूपेन बोराह भाजपमध्ये प्रवेश करत असतील, तर आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याचा पक्ष विचार करू शकतो, असंही शर्मा यांनी संकेत दिले. शर्मा यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप करत म्हटलं की, भूपेन बोराह हे आसाम काँग्रेसमधील शेवटचे हिंदू नेते होते जे आमदार किंवा मंत्री पदावर नव्हते. त्यांच्या राजीनाम्याचा एक प्रतीकात्मक संदेश आहे की काँग्रेसमध्ये सामान्य कुटुंबातील व्यक्तीला पुढे जाण्याची संधी मिळत नाही. बोराह यांच्या राजीनाम्याचं त्यांनी स्वागत केलं असून या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवी घडामोड सुरू झाली आहे. आता बोराह यांचा पुढील राजकीय निर्णय काय असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kriti Sanon: करोडपती बिजनेसमॅनचा हात धरुन लंडनच्या रस्त्यांवर फिरते क्रिती सॅनन, अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल

CM Post Offer: शंभर आमदार आणा अन् मुख्यमंत्री व्हा! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सीएम पदाची ऑफर

Maharashtra Live News Update: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मृत महिलेचा आढळला

Viral Video: इच्छा असेल तर...; विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर चिकटवली २०० रुपयांची नोट, लिहिलेली शायरी वाचून पोट धरून हसाल

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

SCROLL FOR NEXT