अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर प्रथमच अमेरिका तालिबानशी चर्चा करणार... Saam Tv News
देश विदेश

अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर प्रथमच अमेरिका तालिबानशी चर्चा करणार...

अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर अमेरिका प्रथमच तालिबानशी चर्चा करणार आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे या चर्चेकडे लक्ष लागले आहे.

विहंग ठाकूर

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली होती. त्यानंतर आता प्रथमच या दोघांमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे साऱ्या जगाचं या चर्चेकडे लक्ष लागलेलं असणार आहे. अमेरिकन अधिकारी शनिवारी आणि रविवारी दोहामध्ये तालिबानच्या वरिष्ठ प्रतिनिधींना भेटतील. मात्र, तालिबानशी चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंचे प्रतिनिधित्व कोण करेल, हे अमेरिकेने सांगितले नाही. (For the first time since withdrawing from Afghanistan, the US will hold talks with the Taliban)

तालिबान-अमेरिका वार्ता म्हणजे तालिबान ला मान्यता देण्यासाठी नाही असे अमेरिकेने स्पष्ट  केलंय. काही अमेरिकन नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत, त्यांना बाहेर   काढण्याबाबत चर्चा होईल. त्याचसोबत महिलांना शिक्षण आणि नोकरीचे अधिकार द्यावेत  यासाठी अमेरिका तालिबानवर दबाव आणणार आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्याने शरिया कायदा लागू झाला आहे. यानुसार तालिबानने नागरिकांवर आणि त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीवर अनेक कडक नियम लादले आहेत. यात स्त्रियांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले गेले आहे. त्यांना शिक्षण आणि नोकरी यांसारखे मुलभूत अधिकार नाकारले गेले आहेत. त्यामुळे स्त्रियांना हे अधिकार मिळावेत यासाठी अमेरिका तालिबानवर दबाव टाकणार आहे. सोबतच अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

SCROLL FOR NEXT