Manipur Election Results 2022: पहिल्यांदा पत्रकार झालेला फुटबॉलपटू एन. बीरेन सिंग आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार  Saam Tv
देश विदेश

Manipur Election Results 2022: पहिल्यांदा पत्रकार झालेला फुटबॉलपटू एन बीरेन सिंग आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार

मणिपूरचे विद्यमान मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N. Biren Singh) यांनी हिंगांग विधानसभेची जागा जिंकली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: मणिपूरचे विद्यमान मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N. Biren Singh) यांनी हिंगांग विधानसभेची (Legislative Assembly) जागा जिंकली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एन बिरेन सिंह यांना 24 हजार 814 मते मिळाली आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे (Congress) उमेदवार पी.शरदचंद्र सिंह यांचा 18 हजार 271 मतांच्या फरकाने पराभव केला. त्यांना 6,486 मते मिळाली आहेत. एन. बीरेन सिंग यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये (Manipur) भाजपने मोठा विजय मिळवला आहे. 2016 मध्ये जेव्हा त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला तेव्हा ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री होतील अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. सध्या मणिपूरमध्ये त्यांच्यापेक्षा हुशार राजकारणी कोणी नाही हे त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याने सिद्ध केले आहे. (Footballer became journalist first time Biren Singh will Chief Minister 2 time)

हे देखील पहा-

1 जानेवारी 1961 रोजी मणिपूरमध्ये जन्मलेले एन बिरेन सिंग राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार आणि फुटबॉलपटू (Footballer) होते. सुरुवातीपासूनच त्याला फुटबॉलमध्ये रस होता. फार कमी लोकांना माहित असेल की वयाच्या १८ व्या वर्षी बिरेन सिंह यांची बीएसएफच्या फुटबॉल टीमसाठी निवड झाली होती. 1981 मध्ये ड्युरंड कपमध्ये कोलकात्याच्या मोहन बागान फुटबॉल क्लबला पराभूत करणाऱ्या बीएसएफ संघाचाही तो भाग होता. नंतर तो राज्य संघाकडून खेळत राहिला. एन बिरेन सिंग हे खेळासोबतच पत्रकारितेशीही जोडले गेले होते. त्यासाठी त्यांनी प्रथम बीएसएफचा राजीनामा (Resign) दिला आणि स्थानिक भाषेतील वृत्तपत्र सुरू केले. त्यासाठी त्यांनी प्रथम बीएसएफचा राजीनामा दिला आणि स्थानिक भाषेतील वृत्तपत्र सुरू केले. यासाठी त्यांना वडिलांकडून मिळालेली जमीनही विकावी लागली होती, असे सांगितले जाते. पुढे बिरेन सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला आणि येथेही ते यशस्वी झाले.

राजकीय कारकिर्दीची सुरुवात

एन. बीरेन सिंग यांनी पूर्ण तयारीनिशी राजकारणात प्रवेश केला. 2002 च्या विधानसभा निवडणुकीत ते डेमोक्रॅटिक पीपल्स पार्टीच्या तिकिटावर हिंगांग विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2003 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आणि त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. 2007 च्या निवडणुकीत ते हेंगांग जागेवरून पुन्हा निवडून आले. यावेळी त्यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. 2012 च्या विधानसभा निवडणुकीतही एन. बिरेन सिंग त्यांच्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला

ऑक्टोबर 2016 मध्ये एन. बिरेन सिंह यांनी तत्कालीन काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना प्रवक्ते केले. 2017 च्या निवडणुकीत ते चौथ्यांदा हेंगांग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या पी. शरदचंद्र सिंह यांचा 1,206 मतांनी पराभव केला. 2017 च्या निवडणुकीत एन. बिरेन सिंग यांना एकूण 10,349 मते मिळाली.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

SCROLL FOR NEXT