Bihar Viral News Saamtv
देश विदेश

Bihar Viral News: बाबो, चक्क पैशांचा पूर! कालव्यात वाहून आले नोटांचे बंडल; गोळा करायला लोकांची पळापळ

Bihar News Update: कालव्यात वाहून आलेल्या या सर्व 10 आणि 100 च्या नोटा असल्याचं सांगितलं जात आहे.

Gangappa Pujari

Bihar Sasaram News: बिहारमधील सासाराम शहरात शनिवारी एक विचित्र घटना समोर आली आहे. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या मुरादाबादजवळील कालव्यातून मोठ्या प्रमाणात चक्क नोटा मिळत असल्याची माहिती मिळाली. शनिवारी अचानक लोकांना समजलं की, मुरादाबादच्या कालव्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम टाकण्यात आली आहे. माहिती मिळताच नोटा गोळा गर्दी झाली होती. या सर्व 10 आणि 100 च्या नोटा असल्याचं सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारमधील (Bihar News) सासाराम हे शहर सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आले आहे. कारण शहरातील कालव्यात तक्क १० आणि १०० च्या नोटा वाहत आल्याची घटना घडली आहे. या बद्दलची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी कालव्यात उड्या मारल्या. 100 आणि 10 रुपयांचे हे बंडल गोळा करण्याची जणू स्पर्धा लागली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

स्थानिक मीडियानुसार, सासाराम पोलिस सांगत आहेत की या प्रकरणाची अद्याप कोणतीही माहिती नाही. तसेच कालव्यात सापडलेले नोटांचे बंडल खरे की बनावट हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र या घटनेची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

याबद्दल माहिती मिळताच मुफस्सिल पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. नोटांचे बंडल वाहताना पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले. पहाटे नोटांचे बंडले पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर आजूबाजूचे लोक पाण्यात उतरले आणि पैसे लुटण्यास सुरुवात केली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान, ही रोख रक्कम कुठून आली असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नोटा खऱ्या आहेत की खोट्या? हे अद्याप समजलेले नाही, ज्याबद्दलचा पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT