Chennai Flood News Update  Saam TV
देश विदेश

Chennai Flood VIDEO : चेन्नईत इतिहासाची पुनरावृत्ती; 8 वर्षानंतर आजच्याच दिवशी शहरात पूर, जनजीवन विस्कळीत

Chennai Flood News Update : शहराच्या अनेक भागातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पुराचा सार्वजनिक बससेवेवर देखील वाईट परिणाम झाला आहे.

प्रविण वाकचौरे

Chennai Rain Update :

चेन्नईत मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या चेन्नईत इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे .

2015 मध्येही 4 डिसेंबरच्याच दिवशी अल निनोमुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात पूर आला होता. आज, मिचौंग चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे, शहरात आठ वर्षांपूर्वीची जे घडलं तसंत पुन्हा होताना दिसत आहे. . (Latest Marathi News)

शहराच्या अनेक भागातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पुराचा सार्वजनिक बससेवेवर देखील वाईट परिणाम झाला आहे. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही हवाई आणि रेल्वे सेवा ठप्प झाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुल्लुरपेटा स्थानकाजवळील पुल क्रमांक 167 वर पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हावर पोहोचली आहे. शहराच्या अनेक भागात वीज नाही आणि उपनगरातील मदामबक्कम, पेरुंगुडी आदी भागातील परिस्थिती समुद्रासारखी दिसत आहे.

चेन्नईच्या कनाथूर भागात वादळ आणि पावसामुळे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे अलंदूरमधील थिलाई गंगा नगर भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. वडापलानी आणि अरुम्बक्कम भागात पावसामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाली आहेत.

आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूला इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि लगतच्या तमिळनाडू किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र 2 डिसेंबर रोजी खोल दाबामध्ये बदलले. येत्या 12 तासांत त्याचे वादळात रूपांतर होईल. 4 डिसेंबरच्या दुपारपर्यंत ते आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनार्‍याजवळ पोहोचेल. त्यानंतर ते ५ डिसेंबरला आंध्र प्रदेशात धडकेल.

144 रेल्वे गाड्या रद्द

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आंध्र प्रदेशच्या किनारी भागात ३ ते ५ डिसेंबर दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. यातील 118 गाड्या लांब मार्गाच्या आहेत. तर तामिळनाडूमध्ये 100 SDRF जवान तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलन

Post Office Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

SCROLL FOR NEXT