Pakistan Elections Saam Digital
देश विदेश

Pakistan Elections: पाकिस्तानमध्ये हिंदू महिला पहिल्यांदा लढवणार निवडणूक, अल्पसंख्याकावर सर्वाधिक हल्ले होणाऱ्या प्रांतातून रिंगणात

Pakistan Elections News: पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार असून राजकीय पक्षांनी किमान ५ टक्के महिला उमेदवार देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Sandeep Gawade

Pakistan Elections

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार असून राजकीय पक्षांनी किमान ५ टक्के महिला उमेदवार देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीने लगेचच अल्पसंख्याकावर सर्वाधिक हल्ले होणाऱ्या खैबर पख्तूनख्वामधून डॉ. सविरा प्रकाश यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. सविरा या पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याक आहेत.

पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी अल्पसंख्याक २० टक्क्यांहून अधिक होते. मात्र आता ही संख्या ३ टक्क्यांवर आली आहे. पाकिस्तान समानतेचा दावा करत असले तरी या आकडेवारीवरून याचा अंदाज अंदाज येऊ शकतो. हिंदूंव्यतिरिक्त शीख आणि ख्रिश्चनांचाही अल्पसंख्याकांमध्ये समावेश होतो. राजकारणात त्यांच्यासाठी वेगळी तरतूद आणि आरक्षण आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये अल्पसंख्याक मतदारांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली होती. मात्र त्यामुळे फारसा फरक पडला नाही. उलट हिंसाराच्या घटनांमध्ये वाढच झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तानमध्ये तीन मोठे पक्ष आहेत, जे नेहमी सत्तेच्या आसपास राहिले आहेत. त्यामुध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय), पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी). डॉ. सविरा प्रकाश खैबरमधून पीपीपीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरल्या आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या सविरा यांचे वडीलही राजकारणात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanchar Saathi App: संचार साथी अ‍ॅप अनिवार्य नाही, प्री इन्स्टॉलचा केंद्र सरकारचा निर्णय मागे

Health Care : हिवाळ्यात रक्त वाढवण्यासाठी खावेत हे पदार्थ

Sambhajinagar : नामांकित कॉलेजकडून २०० विद्यार्थ्यांची फसवणूक, हॉल तिकीट देण्यास नकार; नेमका काय प्रकार?

Washington Sundar: कोणाला डेट करतोय वॉशिंग्टन सुंदर? जाणून घ्या कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT