BBC
BBC Saam TV
देश विदेश

IT Raid On BBC Office: आयकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर BBC ची पहिली प्रतिक्रिया; ट्विट करत सांगितली परिस्थिती

Gangappa Pujari

IT Raid on BBC Office: मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या माहितीपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या डॉक्युमेंट्रीवरुन गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या डॉक्युमेंट्रीवर बंदी आणली होती.

वाद सुरू असतानाच आता बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी धडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बीबीसी कार्यालयात पाहणी केली जात आहे. (Latest Marathi News)

बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर कॉग्रेससह अनेक पक्षांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसने दिली आहे. या धाडीनंतर बीबीसीकडून अधिकृतपणे पहिली प्रतिक्रिया आली आहे.

ज्यामध्ये "आयकर अधिकारी सध्या नवी दिल्ली आणि मुंबई येथील बीबीसी कार्यालयात आहेत आणि आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. ही परिस्थिती लवकरात लवकर निवळेल अशी आम्हाला आशा आहे," असे ट्विट बीबीसीकडून करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सुचना..

आयकर विभागाने धाड टाकल्यानंतर बीबीसीने त्यांच्या दुपार सत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्यास मनाई केली आहे. तसेच घरुन काम करण्याच्या ही सुचना केल्या आहेत.

माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून आयकर विभागाला या कार्यालयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची माहिती मिळाली होती. याच संदर्भाने ही झाडा झडती सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

बीबीसीच्या (BBC) खात्यांसंबंधीची माहिती आयकर विभागातर्फे खंगाळून काढली जात आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी कार्यालयातील अनेक कंप्यूटर्स आपल्या ताब्यात घेतले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

Tea Time: दिवसातून किती वेळा चहा- कॉफी प्यावी?

Shirur Loksabha: निकालाआधीचं विजयाचा विश्वास! पिंपरी चिंचवडमध्ये झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

SCROLL FOR NEXT