Baby  Saam Tv
देश विदेश

Generation Beta : जनरेशन बीटाला सुरुवात, पहिल्या बाळाचा जन्म; कधी आणि कुठे? नाव ठेवलं खास...

Generation Beta Baby :जनरेशन बीटाला सुरुवात झाली असून या जनरेशनमधील पहिलं बाळ भारतातील मिझोरम या राज्यात जन्माला आले आहे. त्यामुळे हा संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Generation Beta : 2025 पासून जन्मलेल्या पिढीला जनरेशन बीटा म्हणून ओळखले जाते. जनरेशन बीटा अशी पिढी असेल ज्यांचे आयुष्य पूर्णपणे तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. शिक्षणापासून ते आरोग्यसेवा आणि मनोरंजनापर्यंत, एआय आणि ऑटोमेशनने भरलेले नव्या जनरेशनचे आयुष्य असणार आहे. सध्या भारतात या जनरेशनची सुरुवात झाल्याची बातमी सुरु झाली आहे.

१ जानेवारी पासून नविन जनरेशन बीटाला सुरु झाले आणि याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२५ रोजी पहाटे १२:०३ वाजता ऐझॉलमधील डर्टलांग येथील सिनॉड हॉस्पिटलमध्ये देशातील पहिल्या जनरेशन बीटा बाळाचा जन्म झाला आणि मिझोरममध्ये एक ऐतिहासिक क्षण घडला आहे.

फ्रँकी रेमरुआतदिका झाडेंग असे जनरेशन बीटाच्या पहिल्या बाळाचे नाव आहे. ३.१२ किलो वजनाच्या या निरोगी बाळाने एका नवीन पिढीच्या युगाची सुरुवात केली. जनरेशन बीटाशी संबंधित भारतातील पहिले मुलं फ्रँकी याचा जन्म ऐझॉल येथील रामझिरमावी आणि झेडडी रेमरुआतसांगा यांच्या कुटुंबात झाला आहे.

"जनरेशन बीटा" हा शब्द २०२५ ते २०३९ दरम्यान जन्मलेल्या मुलांसाठी वापरण्यात येणार आहे. रामझिरमावीने तिच्या मुलाच्या जन्मावर प्रचंड आनंद व्यक्त केला आणि त्याला मोठ्या अभिमानाचा क्षण म्हटले."जनरेशन बीटा" मध्ये जन्माला येणारी पुढील पिढी आतापर्यंतचे सर्वात तांत्रिकदृष्ट्या प्रगत असणारी पिढी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT