Road Accident news Saam tv new
देश विदेश

कारची दुचाकीला धडक, ३ जिवलग मित्रांना चिरडत नेलं; जागेवरच सोडले प्राण

Horrific Road Accident: फिरोजाबादच्या नरखी पोलीस हद्दीत एका मॅक्स लोडरने तिघा तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

फिरोजाबाद जिल्ह्यातील नरखी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर असलेले तिघेही तरुण जागीच ठार झाले. अपघातानंतर चारचाकी वाहन रस्त्यावरील खड्ड्यात उलटले. दरम्यान, वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सोनू (वय २६), आकाश (वय १९), अमीन (वय २१) असे मृत तरूणांचे नाव आहे. सोनू आपल्या गावाकडे परतत असताना वाटेत त्याला आकाश आणि अमीन हे दोघे मित्र भेटले आणि ते तिघेही एकाच दुचाकीवर होते. गावापासून थोड्याच अंतरावर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

कुटुंबीयांचा संताप

स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नरखी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा केला. त्यानंतर मृत तरूणांच्या कुटुंबाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मात्र, मृतांच्या कुटुंबीयांनी मृतदेह घटनास्थळावरून हलवण्यास स्पष्ट नकार दिला.

यामुळे सुमारे चार तास रस्ता बंद राहिला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एसपी सिटी रविशंकर प्रसाद, एसडीएम सतेंद्र कुमार यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेवटी काही वेळानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रूग्णालयात नेण्यात आले. सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT