Fire broke out in Dubai's Al-Ras apartment saam tv
देश विदेश

Dubai Fire News: दुबईच्या Al-Ras अपार्टमेंटमध्ये भीषण आग! 4 भारतीयांसह 16 जणांचा होरपळून मृत्यू

Fire broke out in Dubai's Al-Ras apartment: दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने या अपघातात चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

Chandrakant Jagtap

Dubai's Al-Ras apartment Fire News : संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) दुबईमध्ये एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भयंकर होती की त्यात 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये चार भारतीयांचा समावेश आहे.

दुबईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने या अपघातात चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

यात केरळमधील एका जोडप्यासह चार भारतीयांचा समावेश आहे. दुबईतील सर्वात जुन्या भांगांपैकी एक असलेल्या अल-रास येथील निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आणि नंतर ती इतर भागातही पसरली.

भारतीय वाणिज्य दूतावासातील वरिष्ठ अधिकारी बिजेंद्र सिंह यांनी सागितले की, "मृतांमध्ये रिजेश कलंगदान, त्यांची पत्नी जेशी कंदमंगलथ, गुडू सलियाकुंडू आणि इमामकासिम अब्दुल खदेर यांचा समावेश आहे. त्याच्या पासपोर्टच्या प्रती आम्हाला मिळाल्या आहेत. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि समर्थनासाठी पोहोचलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि इतरांचे आभार मानतो. त्यांचे मृतदेह परत आणण्यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत".

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई सिव्हिल डिफेन्स ऑपरेशन्स रूमला शनिवारी दुपारी 12.35 च्या सुमारास आग लागल्याचा कॉल आला, त्यानंतर दुबई सिव्हिल डिफेन्स मुख्यालयातील एक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

आतापर्यंत तामिळनाडूतील दोन पुरुष आणि केरळमधील एक जोडप्यांसह चार भारतीय, तीन पाकिस्तानी भाऊ आणि इमारतीत काम करणाऱ्या नायजेरियन महिलेची ओळख पटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT