FIR against Pralhad Joshi brother Gopal Joshi in Dharwad  Saam TV AI
देश विदेश

मोठी बातमी! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भावावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Gopal Joshi FIR : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे भाऊ गोपाळ जोशी यांच्याविरोधात धारवाडमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

FIR against Pralhad Joshi brother Gopal Joshi in Dharwad : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे भाऊ गोपाळ जोशी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कर्नाटकातील धारवाडमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वाद आणि छळाच्या महिलेने केलेल्या गंभीर आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या बातमीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. TOI ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

तक्रारदाराने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ जोशी यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या भावावरच थेट FIR दाखल झाल्यामुळे या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे.

गोपाळ जोशी यांच्याविरोधात एका महिलेने लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर धारवडमधील विद्यागिरी पोलीस ठाण्यात गोपाळ जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण नगर येथील रहिवासी असलेल्या रमा कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे.

गोपाळ जोशीमुळे कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. २५ मे रोजी मालामड्डी येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गोपाळ जोशी यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप केला आहे. रमा कुलकर्णी यांनी त्याच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. विद्यागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपांची चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT