Covid Booster Dose
Covid Booster Dose Saam TV
देश विदेश

Covid Booster Dose: बुस्टर डोसची किंमत आणि संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. दिल्ली, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मास्क घालण्याची सक्तीही संपली आहे. मात्र सरकारचा कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही सुरुच आहे. त्यातच आता केंद्र सरकारने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना बूस्टर डोस (Booster Shot) देण्याची घोषणा केली आहे. 10 एप्रिलपासून, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व प्रौढांना खाजगी लसीकरण केंद्रांवरुन बूस्टर डोस देण्यात येणार आहेत. कोरोना लसीचा हा तिसरा डोस असणार आहे.

बूस्टर डोसची किंमत काय असेल

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी शुक्रवारी बूस्टर डोसच्या किंमतीबद्दल माहिती दिली. पूनावाला यांनी यावेळी बोलताना सांगितले की, 'कोविशील्डच्या बूस्टर डोसची किंमत 600 रुपये असेल. 18 वर्षांवरील लोक त्यांच्या शेजारच्या खाजगी लसीकरण केंद्रावर जाऊन हा बूस्टर डोस घेऊ शकतात.

हे देखील पहा -

बूस्टर डोस म्हणजे काय ते जाणून घ्या

बूस्टर डोस हा कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी एक अतिरिक्त डोस आहे, जो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरेल. यापूर्वी बूस्टर डोसची शिफारस करण्यात आली होती. दरम्यान या बूस्टर डोसमधून असे दिसून आले होते की, दोन लसी घेतल्यानंतरही त्याचा प्रभाव कमी राहीला होता. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली होती, परंतु कालांतराने ती कमी होत गेली. दुसरीकडे, कोरोनाचे नवीन प्राणघातक व्हेरिएंटला रोख लावण्यासाठी बूस्टर डोस घेणे देखील आवश्यक आहे.

बूस्टर डोसची अट अनिवार्य ?

18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बूस्टर डोस जाहीर करताना केंद्राने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि दोन्ही लस घेवून 9 महिने उलटून गेलेले आहेत, त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस दिला जाईल. सर्व खाजगी लसीकरण केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असेल.

बूस्टर डोस मिळविण्याची प्रक्रिया समजून घ्या,

जे यासाठी पात्र आहेत, त्यांना कोविन यांचा संदेश मिळेल. यानंतर, तुम्हाला Cowin च्या www.cowin.gov.in वेबसाइटवर जावे लागेल आणि होम पेजवर दिलेला गेट युवर प्रॅक्युशन डोस वर क्लिक करावे लागेल. तेथे तुम्हाला स्लॉट बुक करण्याचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर तिथे एक OTP येईल. तिथे भरल्यानंतर तुम्हाला आता 9 महिने झाले आहेत की नाही हे दाखवले जाईल. जर तुम्हाला दोन्ही लस घेऊन 9 महिने पूर्ण झाले असतील तर तुमची नोंदणी सहज होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

SCROLL FOR NEXT