Airplane Fight  Saam TV
देश विदेश

Fight in Plane Video : गल्लीतल्या भांडणासारखं विमानात भिडले, प्रवाशांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल

क्रू मेंबर्स याठिकाणी भांडण करणाऱ्या प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

साम टिव्ही ब्युरो

Fight in Plane Video: ट्रेन, बसमध्ये जागेच्या वादावरुन अनेकदा भांडण झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. या वादांचा व्हिडीओ देखील अनेकदा समोर आले आहेत, तुम्ही पाहिलेही असेल. पण आता विमानात झालेल्या राड्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

बँकॉकहून भारतात येणाऱ्या विमानात भांडणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) हालचाली सुरु केल्या आहेत. या सरकारी एजन्सीने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला असून कारवाई करण्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)

थाई एअरवेजच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रवाशांचा एक ग्रुप हाणामारी करताना दिसत आहे. क्रू मेंबर्स याठिकाणी भांडण करणाऱ्या प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भांडण करणाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचंही व्हिडीओत ऐकू येत आहे. (Viral Video)

आता बीसीएएसचे डीजी झुल्फिकार हसन यांनी या प्रकरणी म्हटलं की, आम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेतली आहे. ज्यामध्ये कोलकात्याला जाणाऱ्या थाई एअरवेजच्या फ्लाइटमधील प्रवाशांमध्ये वाद झाला होता. बीसीएएसने संबंधित प्राधिकरणाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

विमानात भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चार-पाच लोक एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. आधी शाब्दीक बाचाबाची आणि नंतर थेट मारहाण झाल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. दरम्यान, क्रू मेंबर्स मध्यस्थी करण्यासाठी येतात, मात्र वाद घालणारे ऐकण्याच्या मनस्थितीन नव्हते. विमानातील बाकीचे प्रवासी आपापल्या सीटवर बसून हा सगळा वाद पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT