Ferris Wheel Ride Saam TV
देश विदेश

Ferris Wheel Ride: फिरता फिरता आकाश पाळणा उंचावर बंद पडला; पुढे काय झालं? दिल्लीतील थरारक घटना...

Ferris Wheel Ride Malfunctions: हवेत उंचावर फिरत असलेला आकाशपाळणा अचानक थांबला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आणि आरडा ओरडा करू लागले होते.

Ruchika Jadhav

Delhi News:

राज्यात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी देवीच्या आगमानामुळे जत्रा भरली आहे. जत्रा म्हटलं की त्यातील सर्वाधिक आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे आकाश पाळणा. आकाश पाळण्यातून उंचावर झुलण्याची हौस अनेकांना असते, अशात दिल्लीतील नरेला येथे एक धक्कादायक घटना घडलीये. हवेत उंचावर फिरत असलेला आकाश पाळणा अचानक थांबला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आणि आरडाओरडा करू लागले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुभाष रामलिला मंदिर परिसरात ही घटना घडली. रात्री १०.३० च्या सुमारात नागरिक मस्त आकाश पाळण्याचा आनंद घेत होते. यावेळी एकूण ५० जण यामध्ये होते. आकाशपाळणा फिरत असताना अचानक बंद पडला. पाळणा बंद का झालाय हे सुरूवातीला येथील व्यक्तींना समजले नाही. मात्र नंतर तांत्रिक बिघाड झाल्याने आकाशपाळणा बंद झाल्याचे समजले. त्यानंतर मंदीरातील व्यवस्थापकांनी तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमक दलाला याबाबत माहिती दिली.

पोलिसांसह अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. येथे पोहचल्यावर आकाशपाळण्यातून उतरणे ज्यांना शक्य होते त्या सर्व व्यक्ती खाली उतरल्या. पुढे अग्निशमन दलातील जवानांनी सर्व नागरिकांना सुखरूप खाली उतरवले. यामध्ये ४ मुलं आणि १२ महिला वरती अडकल्या होत्या. अडकलेल्या एकूण २० जणांना सुखरूप उतरवण्यात आले आहे.

पाळणा वरती उंचावर थांबला तेव्हा नागरिक फार भयभीत झाले होते. अनेक महिला मोठ मोठ्याने किंचाळत होत्या. आपण आता वाचू शकणार नाही अशी भावनाही अनेकांच्या मनात आली असावी. मात्र यामध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT