इंग्लंड: दाताची समस्या ही काही नवीन गोष्ट नाही. बहुतेक लोकांच्या दातांच्या समस्यांवर उपाय म्हणजे दंतवैद्याकडून त्यांचे दात काढणे. जेव्हा ब्रिटनमधील 42 वर्षीय महिलेलाही दातांची समस्या होती. त्यावर उपाय शोधण्यासाठी दंतवैद्याकडे जाण्याऐवजी तिने स्वतःचे दात काढले. माध्यमांच्या अहवालानुसार, जेव्हा डॅनियल वॅट्स नावाच्या महिलेने दातांमध्ये वेदना झाल्याची तक्रार केली, तेव्हा ती तपासण्यासाठी तिच्या भागातील सरकारी रुग्णालयात गेली. त्या महिलेला हे जाणून आश्चर्य वाटले की तेथे दातांचे डॉक्टर नव्हते आणि महिलेकडे खासगी डॉक्टरकडे जाण्यासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीत तिने असे भयंकर पाऊल उचलले, ज्यामुळे तिला आयुष्यभराची वेदना मिळाली.
महिलेचे हसूही गायब
जेव्हा महिलेला तिच्या भागातील खाजगी डॉक्टरची फिस कळाली तेव्हा तिला धक्का बसला. तिला डॉक्टरांची फी परवडत नव्हती, म्हणून महिलेने खतरनाक पाऊल उचलले. एकामागून एक, त्या महिलेने स्वतः 11 दात एकूण 3 वर्षात उपटून टाकले. या पराक्रमानंतर डॅनियलच्या तोंडात फक्त काही दात शिल्लक आहेत. त्यामुळे दात नसल्यामुळे तिच्या चार चौघात हसने देखील टाळते. डॅनियल या घटनेबद्दल म्हणते की 'ही एक अतिशय वेदनादायक प्रक्रिया होती, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.'
आता औषधं घेवून जगतीये आयुष्य
लंडनमध्ये खाजगी दंतचिकित्सकांची फी खूप जास्त आहे, त्यामुळे ज्यांचे बजेट मर्यादित आहे, त्यांना तिथे जाऊन उपचार घेणे कठीण आहे. डॅनियल सुद्धा याच समस्येला बळी पडली आणि आता तिची अवस्था अशी आहे की ती आपले आयुष्य वेदनाशामक औषधांच्या मदतीने घालवत आहे. डॅनियल सांगते की तिने आपला आत्मविश्वास गमावला आहे. तिच्या घराजवळील शासकीय आरोग्य केंद्र 6 वर्षांपूर्वी बंद करण्यात आले होते आणि तेथे दातांचे डॉक्टर नव्हते. अशा परिस्थितीत तिला आयुष्यात असे पाऊल उचलावे लागले.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.