Pahalgam Attack  Saam tv
देश विदेश

Pahalgam Attack : पाकिस्तानी सैन्यात भयकंप; लष्कर प्रमुखाच्या विरोधात 5000 जवानांचा बंडाचा झेंडा, नेमकं काय घडलं? VIDEO

Pakistani army : भारत-पाकिस्तान युद्ध भडकण्याची चिन्हं असतानाच पाक लष्कर प्रमुखाच्या पायाखालची जमीन सरकलीय...तर पाक सैन्याने लष्कर प्रमुखाविरोधातच बंडाचा झेंडा फडकवलाय.. मात्र पाक सैन्य एवढं का बिथरलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी भारत सरकार अॅक्शन मोडवर आलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकलीय...पाकिस्तानी लष्कर प्रमुख असिम मुनीरचं कुटुंब देश सोडून पळालंय. तर घाबरलेला मुनीर युद्धाच्या भीतीने उंदरासारखा बंकरमध्ये लपून बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने मुनीरविरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. तब्बल 5 हजार जवानांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय.

12 वी कोर क्वेटा- 520 सैनिकांचा राजीनामा

फोर्स कमांड नॉर्दर्न एरिया- 380 सैनिकांचा राजीनामा

कोर मंगला- 550 सैनिकांचा राजीनामा

72 तासात 1450 सैनिकांकडून वर्दीचा त्याग

1450 पैकी 600 जण अधिकारी दर्जाचे

अजून तर युद्धाचं नावंही भारतानं घेतलेलं नाही. हवाईदल फक्त सरावच करतंय.तर नौदलसुद्धा आपला नेहमीचा युध्दाभ्यास करत आहे... मात्र त्याआधीच पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडालीय...मात्र घाबरलेलं सैन्य राजीनाम्यासाठी कोणती कारणं देतंय? पाहूयात...

पाकिस्तान घाबरला, सैन्याचे राजीनामे

कमांडरचे वारंवार बदलणारे आदेश

मानसिक थकवा

कुटुंबाचा वाढता दबाव

तर पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असीम मुनीरला जबाबदार धरायला सुरुवात केलीय...मात्र पाकिस्तानी सैन्यात नेमका हा भयकंप का माजलाय?

युद्धासाठी पाक सैन्याची तयारी नसतानाही असीम मुनीर बरळला आहे. पण त्यानंतर भारताची युद्धसज्जता पाहून पाकिस्तानी सैन्याची भंबेरी उडाली आहे. कारण त्यांना माहितीये की समोर सशस्त्र भारत आहे. ज्याने सलग 4 युद्धांमध्ये पाकिस्तानचे मनसुबे धुळीला मिळवलेत. त्यामुळे युद्धसरावाचा ट्रेलर पाहून पाकिस्तानी लष्कर युद्धाआधीच नांग्या टाकणार हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

SCROLL FOR NEXT