Bride Marry With Groom Father Saam TV
देश विदेश

Bride Marry With Groom Father: भरमंडपातून नवरा पळाला; नवरीची अवस्थापाहून सासराच लग्नाला उभा राहिला

Father in law married daughter in law: नवदेवाचे वडिल लग्नासाठी उभे राहिले. त्यांनी आपल्या होणाऱ्या सुनेसोबत विविह केला आहे.

Ruchika Jadhav

Jakarta News:

लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा विषय असतो. लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेव दोघेही फार खुश असतात. अशात जकार्ता येथून एक अजब घटना लग्न समोर आली आहे. यामध्ये नवरदेवाने लग्नातून पळ काढला. त्यामुळे नवरदेवाचे वडिल लग्नासाठी उभे राहिले. त्यांनी आपल्या होणाऱ्या सुनेसोबत विविह केला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तरुण आणि तरुणी दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. पुढे कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या घरच्यांनी लग्नाची जबरदस्त तयारी केली.

मांडव सजला. नवरदेव आपले वऱ्हाडी घेऊन मंडपात आला. काही वेळात काय घडलं ते समजलं नाही. मात्र नवऱ्या मुलाने लग्नाला नकार दिला आणि भरमंडपातून तो पळून गेला. मंडपातून नवरा पळाल्याने एकच चर्चा सुरू झाली.

असे घडल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांची बदनामी होणार. या मुलीशी पुन्हा कोण लग्न करणार? असे विचार सासऱ्याच्या मनात आले. मुलीच्या कुटुंबीयांनी या लग्नासाठी बराच खर्च केला होता. हे सर्व वाया जाऊनये म्हणून सासऱ्याने आपल्या होणाऱ्या सुनेशी विवाह करत तिला आपली पत्नी बनवलं आहे.

इंडोनेशियामधील जकार्तामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काही तासांतच व्हिडीओला लाखोंच्या घरात व्ह्युव्ज आलेत. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

SCROLL FOR NEXT