Accident News Saam Tv
देश विदेश

Karnataka Accident News: कर्नाटकात भीषण रस्ता अपघात, उभ्या ट्रकला वाहनाची धडक; 5 ठार, 13 जखमी

Accident News in Marathi: कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे.

Shivani Tichkule

Karnataka News Today: कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बालीचक्र क्रॉसजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले सर्व आंध्र प्रदेशातील नंद्याल जिल्ह्यातील वेलागोडू गावातील रहिवासी आहेत. हे सर्वजण कर्नाटकातील कलबुर्गी येथे ख्वाजा बंदेनवाज उर्समध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. मंगळवारी (६ जून) पहाटे ४ वाजता हा अपघात झाला. १८ जणांना घेऊन जाणाऱ्या वाहनाने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

या भीषण अपघाताची माहिती माहिती मिळताच यादगिरीचे डेप्युटी एसपी बसवेश्वर, सैदापूरचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) येथे हलविण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Badlapur Tourism : रिमझिम पावसात धबधब्याखाली चिंब भिजा, येणारा वीकेंड बदलापूरला प्लान करा

Pune : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

SCROLL FOR NEXT