Farmers at Punjab Haryana Border PTI
देश विदेश

Farmers Protest: दिल्ली मोर्चाला पुन्हा ब्रेक! पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा, अनेक शेतकरी जखमी

Farmers at Punjab Haryana Border: दिल्ली चलो मार्चदरम्यान, शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी शंभू सीमेवर गटाला परत बोलावण्याची घोषणा केली. अश्रुधुरांच्या गोळ्या लागल्याने काही शेतकरी जखमी झाले आहेत.

Bharat Jadhav

पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांनी पायी दिल्लीच्या दिशेने कूच केले, मात्र हरियाणा पोलिसांनी त्यांना पुलावर रोखले. शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि त्यानंतर हाणामारी झाली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुरांच्या नळकांड्याचा मारा केला

यात अनेक शेतकरी जखमी झालेत. अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा हल्ला पोलिसांकडून झाल्यानंतर शेतकरी काही मीटर मागे गेले आहेत. यातील काही शेतकऱ्यांनी आपला चेहरा रुमालाने झाकला होता. तर काहींनी डोळ्यावर चष्मा घातला होता. तर काही शेतकरी त्या अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा मारा वाचवत मागे पळत होते.

शेतकरी बॅरिकेड्सपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी पाण्याच्या जेटचाही वापर पोलिसांकडून करण्यात आला. यानंतर दिल्ली चलो मार्चो करणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध निदर्शन आंदोलन एका दिवसासाठी स्थगित करण्यात आलं. शेतकरी नेत्यांनी जखमी झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आधी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. त्यानंतर अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा मारा केला. पोलिसांनी भोळ्या शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात अडवलं असा आरोप शेतकरी नेते सरवन सिंग पंधेर यांनी केला.

दिल्ली चलो मार्चदरम्यान शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी शंभू सीमेवरील शेतकऱ्यांचा गटाला परत बोलावण्याची घोषणा केली. आज आम्ही शेतकऱ्यांच्या गटाला माघारी बोलण्याची घोषणा केली. पोलिसांच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झालाय. तर ८ ते ९ जणही जखमी झालेत. संयुक्त शेतकरी मोर्चा आणि शेतकरी मजदूर मोर्चाच्या बैठकीनंतर पुढील रणनिती ठरवली जाईल असं पंधेर म्हणालेत.

"सकाळपासून पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आलीय. आम्ही शेतकऱ्यांची ओळख आणि परवानगी तपासू, त्यानंतरच त्यांना पुढे जाण्यास परवानगी देऊ, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. यावर शेतकऱ्यांनी असहमती दर्शवली. शेतकऱ्यांनी शांती ठेवावी आणि परवानगी घेऊनच प्रवेश करावा असं डीएसपी शाहाबाद रामकुमार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैकिांनी फोडलं, पाहा VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्याला तोबा गर्दी, वरळी डोमबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

SCROLL FOR NEXT