गेल्या काही दिवसांपासून हरियाणाच्या अंबाला जवळील शंभू सीमेवर किमान हमी भावाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. याच शेतकरी आंदोलनादरम्यान ६३ वर्षीय आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. (Latest Marathi News)
मीडिया रिपोर्टनुसार, ज्ञान सिंह यांना सकाळी छातीत दु:खत होतं. त्यानंतर पंजाबच्या राजपुरा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर पुन्हा पटियाला येथील राजिंदरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील ज्ञान सिंह हे दोन दिवसांपूर्वी शेतकरी 'दिल्ली चलो' या आंदोलनात शंभू सीमेवर आले होते. या आंदोलनाचा मुख्य उद्देश हा किमान हमी भावासाठी आंदोलन करत आहेत. या मागणीसाठी शेतकरी आंदोलक सरकारवर दबाव आणत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'संयुक्त किसान मोर्चा' (बिगर राजकीय) आणि शेतकरी मजदूर मोर्चाने 'दिल्ली चलो' या मोर्चाचं आयोजन केलं आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर ठाण मांडलं आहे.
शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारीला भारत बंद करण्याचंही आवाहन केलं होतं. त्यामुळे दिल्लीत कार्यालयीन कामात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
गाझीपूर सीमेवर गाड्यांची लांबच लांब रांगा लागण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी आंदोलनामुळे रस्त्यात बॅरिकेडिंग लावण्यात आले आहेत. याच शेतकरी आंदोलनामुळे गेल्या चार दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर भयानक वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.