Viral Video Saam Tv
देश विदेश

Farmer Talks to PM Modi Video: PM मोदींच्या फोटोला Kiss केलं; फोटोसोबत 'मन की बात' करता-करता भावुक झाला

Viral Video : शेतकरी मोदी सरकारच्या विविध योजनांचं कौतुक करतानाही दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Karnataka farmer viral video : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीका करणारा मोठा वर्ग आहे. मात्र मोदींवर प्रेम करणारा वर्गही तेवढाच मोठा आहे. म्हणून देशात मोदींच्या चाहत्यांनी त्यांचं मंदिरही उभारलं आहे. असाच एका सर्मथकाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये पीएम मोदींना पाहून या चाहत्याला अश्रू अनावर झाले आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडीओ कर्नाटकातील आहे. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती शेतकरी आहे. एका बसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटा पाहून शेतकरी काहीसा भावूक झालेला दिसला. शेतकरी मोदींच्या फोटोशी बोलतानाही दिसत आहे. मोदींशी बोलताना या शेतकऱ्याला रडू देखील आलेलं पाहायया मिळतंय. शेतकरी मोदींच्या फोटोला किस करतानाही दिसतोय.

शेतकरी मोदी सरकारच्या विविध योजनांचं कौतुक करतानाही दिसत आहे. मला हजार रुपये मिळत होते. तुमच्यामुळे आणखी 500 रुपये मिळाले. तुम्ही आमच्या आरोग्य सेवेसाठी 5 लाख रुपये देण्याचे ठरवलं. तुम्ही जग जिंकाल. हा व्हिडीओ भाजप समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या झाल्या आहेत. राज्यात 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी पार पडेल. काँग्रेस आणि भाजपमध्ये यांच्यात याठिकाणी लढाई दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT