PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi Yojana  Saam Tv
देश विदेश

PM Kisan Yojna: शेतकऱ्यांनो लवकर करा हे काम, अन्यथा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही

साम टिव्ही ब्युरो

PM Kisan Yojna : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम-किसान योजनेचा 13 वा हप्ता या महिन्यात सरकारकडून जारी केला जाऊ शकते. जानेवारी महिन्यातच पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील अशी अपेक्षा आहे.  पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.

शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. तसेच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. मात्र, यावेळी पीएम किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकत नाहीत.

पीएम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. या योजनेद्वारे शेतकर्‍यांच्या कुटुंबांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी संबंधित विविध कामांसाठी मदत केली जाते. या योजनेंतर्गत, ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे अशा सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना लाभ मिळण्यास पात्र आहे.  (Latest Marathi News)

फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जातात ज्यांची पीएम किसान योजनेत नोंदणी झाली आहे आणि त्यांचे केवायसी देखील झाले आहे. दुसरीकडे, जर नोंदणी झाली असेल परंतु केवायसी केले नसेल, तर 13 व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात येणार नाहीत. PM किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी KYC असणे खूप महत्वाचे आहे.

केवायसी ऑनलाइन करायचे असल्यास, ओटीपी आधारित ईकेवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. शेतकरी बायोमेट्रिक आधारित केवायसी देखील करू शकतात. बायोमेट्रिक केवायसीसाठी सीएससी केंद्रांना भेट देऊन केवायसी करता येईल. त्यामुळे जर पीएम किसानच्या 13व्या हप्त्याचा लाभ हवा असेल, तर लवकरच केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT