ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बेसन हलवा ही एक पारंपारिक मिठाई आहे. हा हलवा बेसन, तूप, साखर आणि वेलची पासून बनवला जातो.
स्वाद वाढवण्यासाठी यात काजू, बदाम आणि पिस्ता यांसारखा मावा देखील मिक्स करु शकता.
बेसन मध्यम आचेवर सोनेरी तपकिरी होईपर्यंत आणि चांगला वास येईपर्यंत भाजून घ्या.
तूपाचा वापर केल्यास बेसन मऊ होण्यास मदत होते आणि तूपामुळे हलव्याला रिच फ्लेवर मिळतो.
साखरेला पाण्यात मिक्स करुन साखरेचा पाक बनवा आणि त्यात भाजलेल बेसन मिक्स करा.
हलव्यामध्ये वेलची पावडर घालून त्याचा सुगंध आणि चव वाढवा.
हलव्याला मंद आचेवर तूप सुटेपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
तयार झालेल्या हलव्यामध्ये सुकामेवा टाका आणि गरमागरम सर्व्ह करा आणि खाण्याचा आनंद घ्या.