ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चिल्ला हा एक आरोग्यदायी आणि चविष्ट नाश्त्याचा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मोठ्या आवडीने खातात.
रवा, बेसन आणि मैदा यापासून अनेक प्रकारचे चीले बनवले जातात. हिवाळ्ळ्यात तुम्ही बाजरीचे चीले देखील बनवू शकता, ते चवीला चविष्ट असतात.
तूप किंवा तेल, बाजरीचे पीठ, दही, कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, मसाले, धणे पावडर आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
बाजरीचे पीठ दह्यात मिक्स करा आणि थोडावेळ तसेच ठेवून द्या. पीठ गुळगुळीत होईल आणि चीला चांगला होण्यास मदत होईल.
आता कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. नंतर, सर्व भाज्या पिठात मिसळा.
चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून गुळगुळीत पीठ बनवा. आता तूप किंवा तेल लावा आणि ते तव्यावर पसरवा.
चीला मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या.
तयार झालेला चीला चटणी किंवा लोणच्या सोबत गरमागरम सर्व्ह करा. तसेच तुम्ही चहासोबत देखील खाऊ शकता.