Goa Election: शरद पवारांच्या प्रयत्नांना गोव्यात यश येणार नाही; फडणवीसांचं भाकित Saam TV
देश विदेश

Goa Election: शरद पवारांच्या प्रयत्नांना गोव्यात यश येणार नाही; फडणवीसांचं भाकित

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे गोव्यात महाविकास आघाडीची प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, गोव्यात शरद पवारांच्या प्रयत्नात यश येणार नाही, असं भाजपचे विरोधापक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

अनिल पाटील

गोवा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे गोव्यात महाविकास आघाडीची प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, गोव्यात शरद पवारांच्या प्रयत्नात यश येणार नाही, असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देशात सध्या ५ राज्यांतील निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार् अॅक्टीव मोडवरती असून ते (Sharad Pawar) उत्तर प्रदेशच्या दौरा करणार आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे. मणिपूरमध्येही ५ जागांवर राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात असतील. तर गोव्यातही (Goa) शिवसेना- राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनी दिली. याच पार्श्वभूमिवरती विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.

हे देखील पहा -

ते आज गोव्यात बोलत होते या वेळी त्यांनी पंजाब सरकारवरती टीका करत अनेक आरोपही केले आहेत. ते म्हणाले, 'पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत पंजाब सरकारने (Panjab) केलेला कारभार हा निंदनीय आहे. तर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री, सचिव, आणि डी.जी यापैकी कोणीच नव्हते पंतप्रधान थांबले ती जागा पाक तोफखान्याच्या रेंज मध्ये असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.

तसंच आपण या घटनेची निंदा करत आहोत शिवाय पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांना खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही. कारण संविधानानी दिलेल्या ड्युटीचे पालन ते करत नाहीत असं म्हणत त्यांनी मोदींच्या (Narendra Modi) पंजाब दौऱ्यातील त्रुटी या सरकार पुरस्कृत होत्या. तसंच या घटनेमागे मुख्यमंत्र्यांचा हात होता का? याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केली आहे.

शरद पवार काय म्हणाले ?

गोव्यात काँग्रेस (Congress) पार्टी, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु असून गोव्यामध्ये भाजपला पर्याय देण्याचा आमचा विचार सुरु असून गोव्यातून भाजप सरकार घालविण्याची गरज आहे. आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे अशी आमची इच्छा असल्याचं पवार म्हणाले. तसंच राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत (Sanjay Raut) व तेथील कॉंग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात गोव्यातील निवडणुकीसंदर्भात निर्णय होईल असं पवार यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT