Liquor Policy Viral Messages Saam Tv
देश विदेश

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारने आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

Liquor Policy Viral Messages: आता बातमी आहे मद्य प्रेमींसाठी आनंदाची. कारण आता मद्य प्रेमींना स्वस्तात दारू मिळणाराय असा दावा करण्यात आलाय.

Sandeep Chavan

मद्यप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी. फक्त 99 रुपयांना मद्यप्रेमींच्या आवडीचा ब्रँड मिळणाराय. सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे आता मद्यप्रेमींना थोडासा दिलासा मिळणाराय. दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक असलं तरी अनेकजण दारू पितात. मात्र, आता 99 रुपयांत आवडीचा ब्रँड मिळणार असल्याचा दावा केला जातोय. हा दावा खरा आहे का? सरकारने 99 रुपयांत दारू देण्याचं नवीन धोरण अवलंबलय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय ते जाणून घेऊ...

व्हायरल मेसेज

सतत दारूच्या किंमती वाढल्याने हैराण झालेल्या मद्यप्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी. मद्यप्रेमींना आता स्वस्त दारूची व्यवस्था सरकारनं केलीय. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर लोकांना त्यांचा आवडता ब्रँड फक्त 99 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

हा दावा केल्यानं मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एवढ्या स्वस्तात आवडती दारू मिळणार असल्याने अनेकांनी जल्लोष साजरा केलाय. मात्र, हे धोरण आपल्या राज्यात राबवलं जाणार आहे का? दारू ही हानिकारक आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेयत. तरीदेखील सरकारने असा निर्णय का घेतलाय? याची आम्ही पडताळणी सुरू केली. आमच्या प्रतिनिधींनी सरकारचा असा कोणता जीआर आहे का? याची माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं ते जाणून घेऊ..

व्हायरल सत्य

आमच्या पडताळणीत आवडत्या ब्रँडची दारू 99 रुपयांत मिळणार हे महाराष्ट्र सरकारचं धोरण नाही, अशी माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने हा निर्णय घेतलाय. मद्यप्रेमी लोकांसाठी नायडू सरकारने नवीन धोरण तयार केलंय. धोरणाची अंमलबजावणी झाल्यावर आवडता ब्रँड फक्त 99 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ग्राहक कोणत्याही ब्रँडचा 180 मिली पेग 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. 1 ऑक्टोबरपासून आंध्र प्रदेशात नवीन नियम लागू होणार.

दारूच्या धोरणासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू सरकारने नवीन दारू धोरणाला मंजुरी दिलीय. त्यामुळे मद्य प्रेमींना फायदा होणाराय. आंध्र प्रदेश सरकारचं नवीन मद्य धोरण काय आहे? जाणून घेऊ..

आंध्र प्रदेश सरकारचं मद्य धोरण काय?

नव्या धोरणात सर्व ब्रँडच्या दारूच्या किमती कमी केल्या आहेत. मद्यप्रेमी सर्वच ब्रँडची दारू फक्त 99 रुपयांना विकत घेऊ शकतील. दारू दुकानांना लॉटरी पद्धतीने 2 वर्षांसाठी परवाने दिले जाणार आहेत. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत दारूची दुकाने सुरू राहतील.

नवीन दारू धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आंध्र प्रदेशच्या महसुलात सुमारे 2 हजार कोटी रुपयांची मोठी वाढ होईल, असा विश्वास नायडू सरकारला आहे. सरकारच्या नवीन धोरणामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासही मदत होईल, तसंच या बदलामुळे दारू तस्करीलाही आळा बसेल, अशी अपेक्षा आंध्र प्रदेश सरकारला आहे. त्यामुळे आवडत्या ब्रँडची दारू 99 रुपयांना मिळणार हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

Prajakta Mali : 'फुलवंती'ची OTT वर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; चक्क हॉलिवूडला टाकलं मागे, प्राजक्ता माळीने चाहत्यांचे मानले आभार

SCROLL FOR NEXT