Ram Mandir 500 Rupees Note Saam Tv
देश विदेश

RBI ने श्रीरामाच्या नावाने 500 रुपयांची नोट केली जारी? व्हायरल फोटोचे सत्य जाणून घ्या

Ram Mandir 500 Rupees Note: राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी मोठ्या उत्साहाने सुरु आहे. यातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो आहे 500 रुपयांच्या नोटाचा.

Satish Kengar

Ram Mandir 500 Rupees Note:

अयोध्येतील राम मंदिरात राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी मोठ्या उत्साहाने सुरु आहे. यातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो आहे 500 रुपयांच्या नोटाचा. या नोटेवर राम मंदिरा आणि श्रीरामाची प्रतिमा दिसत आहे.

ही हुबेहूब खऱ्या नोटेसारखी दिसत असून ही नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केल्याचा दावा केला जात आहे. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने ही जारी करण्यात आल्याचा दावा करण्यात येते आहे. मात्र व्हायरल झालेल्या फोटोमागचे सत्य नेमकं काय आहे? हेच जाणून घेऊ...  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नोटेवर राम मंदिर आणि श्रीरामाचा फोटो

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 500 रुपयांच्या नोटेवर समोर श्रीरामाचा आणि मागच्या बाजूला राम मंदिराचा फोटो आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही नोट कोणीतरी एडिट करून अपलोड केली आहे. तसेच ही नोट भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेली नाही. आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर त्याच्या प्रकाशनासंबंधी कोणतीही पोस्ट किंवा तपशील नाही उपलब्ध नाही. (Latest Marathi News)

हा फोटो एक्स (ट्विटर) युजर रघुन मूर्ती याने तयार केला होता आणि 14 जानेवारी 2024 रोजी अपलोड केला होता. मात्र कोणीतरी हा फोटो एडिट करून याचा गैरवापर केला आणि नंतर नोटबद्दल अनेक अफवा पसरवल्या.

व्हायरल फोटो पाहिल्यानंतर रघुनने त्याच्या अकाउंटवर एक नोटेचा फोटो पोस्ट करत याबाबत नेमकं सत्य काय आहे, हे सांगितलं. त्याने लोकांना आपल्या क्रिएटिव्ह कामाचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन केले. जर काही चुकीची माहिती किंवा अफवा पसरली तर त्याला मी जबाबदार नाही, असंही तो म्हणाला आहे.

त्याने सांगितलं आहे की, मी केलेल्या क्रिएटिव्ह कामावर X रघुनमूर्ती 07’ चा वॉटरमार्कही टाकला होता. जो नंतर कोणीतरी काढला. याशिवाय राम मंदिर आणि श्रीरामचा फोटोही यावर एडिट करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT