Facebook-Instagram Update: Two-Hour Limit and Midnight-to-6AM Block for Teens 
देश विदेश

Facebook, INSTA वर दररोज 6 तासांची बंदी; 18 वर्षांखालील मुलांसाठी कडक नियम

FB,Instagram Banned: आता बातमी सोशल मीडियासंदर्भातली. तुमच्या सोशल मीडिया वापरावर लवकरच निर्बंध येण्याची शक्यता आहे. कारण, मेटावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून नियमावली जारी करावे लागलेत. मेटाला कुणी दंड ठोठावलाय? आणि नवे निर्बंध काय आहेत?. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

Rohit Kadam

सोशल मीडिया वापरावर आता निर्बंध येणार आहेत... होय.. तुम्ही बरोबर ऐकलंत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसंदर्भात मेटानं मोठा निर्णय घेतलाय. 18 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर कडक नियम लागू करण्यात आलेत. आता फेसबूक आणि इन्स्टाग्राम दररोज सहा तास बंद राहणार आहे. रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे. ही बंदी केवळ अमेरिकेत लागू करण्यात आलीय. विशेष म्हणजे, अमेरिकेतील अनेक राज्यांच्या अॅटर्नी जनरलनी 2023 मध्ये मेटावर अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाचे व्यसन लावल्याप्रकरणी खटला दाखल केला होता. आता हा खटला निकाली निघाल्यानंतर मेटासोबत झालेल्या करारानुसार सोशल मीडियाच्या वापरावर कोणते निर्बंध आलेत?.पाहूयात.

FB, इन्स्टावर दररोज 6 तासांची बंदी

18 वर्षांखालील मुलांसाठी फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर दिवसाला 2 तासांपुरता मर्यादित

रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत मुलांसाठी दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बंद

सकाळी 8 ते दुपारी 3 या शाळेच्या वेळेत सोशल मीडिया बंद राहणार

अमेरिकेतील बालसुरक्षेचा खटला निकाली काढण्यासाठी मेटा सुमारे 17 हजार कोटींची भरपाई देणार

मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी वयाची पडताळणी अधिक कठोर करत पालकांना नियंत्रणाचे अधिकार मिळणार

मेटा आता जगभरात अल्पवयीन मुलांसाठी एक नियमावली तयार करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारख्या देशांनी आधीच सोशल मीडिया वापरासंदर्भात बंदीचा प्रस्ताव आणलाय. तर दुसरीकडे भारतातही मुलांचा स्क्रीन टाईम आणि सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध आणण्याची मागणी होतेय. एव्हंढच नाही तर मेटाचे केंद्र सरकारशी खटकेही उडत आहेत. त्यामुळे आगामी काळात सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध आणण्यास केंद्र सरकारही मेटाला भाग पाडणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ; जैवविविधतेसह प्राचीन मंदिरांना धोका

'Bigg Boss 20'च्या घरात आठवडाभर चालणार 'या' सदस्याची सत्ता, यंग डीएसएनंतर नवा कॅप्टन कोण?

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलवरील करावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Sindhudurg : कोकणच्या किनाऱ्यावरील 'काशी'! 'या' ठिकाणाचं सौंदर्य पाहून भान हरपेल

Kitchen Hacks : मिक्सरची पाती बोथट झाली आहेत? 'ही' एक ट्रिक वापरून घरच्या घरी काढा धार, पैसे आणि वेळ वाचेल

SCROLL FOR NEXT