फेसबुकवरील मैत्री पडली चांगलीच महागात  Saam Tv
देश विदेश

फेसबुकवरील मैत्री पडली चांगलीच महागात

उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना घडलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये Uttar Pradesh माणुसकीला काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना घडलेली आहे. एका तरुणीला चक्क फेसबुकवर Facebook झालेली मैत्री Friendship चांगलीच महागात पडलेली आहे. एका Video कॉलमुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तरुणीवर आत्महत्या Suicide करण्याची वेळ आलेली आहे. फेसबुक वरच्या मित्राने तरुणीला गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवले होते. व्हिडीओ कॉल करून, त्यान तिचे काही आक्षेपार्ह स्क्रिनशॉट काढल आणि ते फोटो Photo व्हायरल Viral करण्याची धमकी देत ब्लॅकमेल blackmailing करायला सुरुवात केली आहे.

हे देखील पहा-

यामुळे तरुणासमोर त्याचा खरा चेहरा समोर आला. त्रस्त झालेल्या, तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. आरोपीला अटक देखील करण्यात आले आहे. आरोपी हा लखनऊचा रहिवासी आहे. बेलबाग पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणीची २०२० मध्ये लखनऊ या ठिकाणी शिवणकाम करणाऱ्या २१ वर्षीय शाबाद उर्फ मोहम्मद याच्याशी ओळख झालेली होती.

शाबाद लखनऊपासून ७० किमी दूर राहत असत. आरोपीने स्वत: विषयीची खरी असलेली माहिती न देता तरुणी बरोबर मैत्री केली आहे. सुरुवातीला ते सोशल मीडियावर चॅट करत असत. त्यानंतर पुढे ते एकमेकांना मोबाईलवरुन बोलू लागले होते. आरोपी शादाबने काही दिवसांअगोदर तरुणीला व्हिडीओ कॉल केले होते. त्यानी तरुणीला फसवून, व्हिडीओ कॉलचे स्क्रीनशॉट काढले होते. यानंतर पैसे दिले नाही, तर हे फोटो व्हायरल करणार आहे, अशी धमकी देऊ लागला होता.

सत्य समोर आल्यावर तरुणीने त्याच्याशी बोलने बंद केले. यानंतर शादाबने ते फोटो तरुणीच्या नातेवाईकांना पाठवले आहे. ज्यानंतर घरात मोठा गोंधळ उडाला. यानंतर तो तरुणीला सारखे धमकी देत असत. पैसे दिले नाही, तर सर्व फेसबुक फ्रेंड्सना हे फोटो मी सर्व ठिकाणी शेअर करेन अशी धमकी नेहमीच देत होता. शादाबकडून सुरू असलेले हे ब्लॅकमेलिंग आणि फोटो कुटुंबीयांना पाठविल्यावर झालेल्या वादामध्ये तरुणी निराश झाली. ४ दिवसांअगोदर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता.

यानंतर कुटुंबीयांनी पोलिसामध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एक टीम लखनऊला पाठवली असता. त्याठिकाणी आरोपीचा IP एड्रेस ट्रॅक करून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चौकशी मधून आलेल्या माहितीनुसार, आरोपी हा १० वी पास आहे. पुढील शिक्षण घेण्याऐवजी त्याने शिवणकाम सुरू केले आहे. आरोपीला जबलपूर कोर्टामध्ये हजर केल्यावर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आलेली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलेले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT