IRCTC Launches Unique Pilgrimage Train Connecting 4 Jyotirlingas Saam
देश विदेश

शिवभक्तांसाठी खूशखबर! IRCTC कडून धार्मिक यात्रा; ४ ज्योतिर्लिंग अन् स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहता येणार, पाहा तिकीटाचे दर

IRCTC Launches Unique Pilgrimage Train Connecting 4 Jyotirlingas: IRCTCने ४ ज्योतिर्लिंगे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी जोडणारा विशेष ट्रेन प्रवास सुरू केला आहे. प्रवाशांना यातून जेवण, निवास आणि मार्गदर्शन सुविधा मिळेल.

Bhagyashree Kamble

  • IRCTCकडून विशेष धार्मिक यात्रा ट्रेन.

  • ४ ज्योतिर्लिंग आणि स्टेच्यू ऑफ युनिटी पाहता येणार.

  • प्रवाशांसाठी खास सुविधा उपलब्ध.

भारत ही श्रद्धा, अध्यात्म आणि संस्कृतीचा अद्भुत संगम असलेला देश आहे. प्रत्येक राज्यात आणि शहरात विविध देवस्थान आणि मंदिरे आहेत जे श्रद्धेने परिपूर्ण आहेत. विशेषत: भगवान शिव यांच्या १२ ज्योतिर्लिंग. या पवित्र स्थळांचा एक वेगळेच महत्व आहे. य़ाच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास भेट आणली आहे. आयआरसीटीसीने आता ४ प्रमुख ज्योतिर्लिंगे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी यांना जोडणारा विशेष रेल्वे प्रवास सुरू केला आहे.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे भारत गौरव स्पेशल टुरिस्ट ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या टुरिस्ट ट्रेनद्वारे प्रवाशांना एका सहलीत चार ज्योतिर्लिंगांना भेट देण्याची संधी मिळते. हा प्रवास केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा नाही, तर, प्रवाशांना भारतातील विविध संस्कृतीही अनुभवता येणार आहे.

कोणत्या ४ ज्योतिर्लिंगांचा समावेश आहे?

महाकालेश्वर- उज्जेन, मध्यप्रदेश.

ओंकारेश्वर - मध्य प्रदेश.

नागेश्वर ज्योतिर्लिंग - द्वारका, गुजरात.

सोमनाथ ज्योतिर्लिंग- वेरावळ, गुजरात.

या व्यतिरिक्त, प्रवाशांना गुजरातमधील केवडिया येथे स्थित जगातील सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्याची संधी मिळेल. तसेच व्हॅली ऑफ हा फ्लॉवर्स आणि सरदार पटेल प्राणीसंग्रहालयही पाहता येणार आहे.

सहलीचा प्रवास कार्यक्रम कसा असेल?

सहलीची सुरूवात पंजाबमधील अमृतसर येथून होते.

उज्जेन - प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती अनुभवता येईल.

ओंकारेश्वर - नर्मदा किनारी असलेल्या मंदिरात दर्शन घेता येईल.

केवडिया - स्टॅच्यू ऑफ युनिटी, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि सरदार पटेल प्राणीसंग्रहालयाला भेट देण्याची संधी.

द्वारका - द्वारकाधीष मंदिर दर्शन आणि समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका.

नागेश्वर ज्योतिर्लिंग - भव्यदिव्य आरती.

सोमनाथ ज्योतिर्लिंग - बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिला ज्योतिर्लिंग.

सहलीनंतर ट्रेन पुन्हा अमृतसरला पोहोचेल.

भाडे आणि सुविधा

स्लीपर क्लास - १९,५५५ प्रति व्यक्ती.

थर्ड एसी - २७,८१५ प्रति व्यक्ती.

सेकंड एसी - ३९४१० प्रति व्यक्ती.

प्रवासादरम्यान, प्रवाशांना जेवण, निवास., वाहतूक आणि मार्गदर्शन सुविधा उपलब्ध असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nightclub Fire : गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २३ जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

Raigad Tala Fort: रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा|Video Viral

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

SCROLL FOR NEXT