Explainer Saam Digital
देश विदेश

Explainer : सुनीता विल्यम्स अंतराळातून करणार मतदान, कशी आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर

Sunita Williams : नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत.

Sandeep Gawade

अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकांची धामधूम सूरू असून कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातीव चर्चाही स्फोटक होताना दिसत आहे. त्यातच अंतराळात अडकेलेले नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळातून मदतानाचा हक्क बजावणार आहेत. दोघंही टेक्सासचे रहिवाशी आहेत. इतक्या लांबूनही कसं मतदान करता येतं आणि अमेरिकेची ही निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी आहे जाणून घेऊया.

अमेरिकेत ५ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळवीरांसाठी डिझाइन केलेल्या प्रक्रियेचा वापर करून मतदान करणार आहेत. “अमेरिकेचे नागरिक म्हणून आम्ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नासाने आमच्यासाठी ही प्रक्रिया अगदी सोपी केली आहे.” असं बुच विल्मोर यांनी म्हटलं आहे.

कोणी केलं पहिलं मतदान?

टेक्सासच्या खासदारांनी १९९७ मध्ये अंतराळवीरांना अंतराळातून मतदान करता यावं यासाठी एक विधेयक मंजूर केलं होतं. तेव्हापासून मतदानाची ही प्रक्रिया अमलात आहे. अंतराळातून पहिल्यादा मतदान करण्याचा मान अंतराळवीर डेव्हिड वुल्फ यांना जातो. पूर्वीच्या सोविएत युनियनद्वारे चालवण्यात आलेल्या मिर या अंतराळस्थानकावरून मतदान केलं होतं, जे अंतराळस्थानक सध्या बंद आहे. अलीकडेच नासाच्या अंतराळवीर केट रुबिन्सने २०२० च्या निवडणुकीत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून मतदान केलं होतं.

कशी आहे मतदान प्रक्रिया?

नासाच्या स्पेस कम्युनिकेशन्स अॅण्ड नेव्हिगेशनमधील (SCaN) प्रणालीद्वारे ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. अंतराळवीर अंतराळातून इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका भरतात. त्यानंतर मतपत्रिका एनक्रिप्ट केली जाते आणि नासाच्या नियर स्पेस नेटवर्कद्वारे पृथ्वीवर पाठवली जाते. एनक्रिप्शनमध्ये ही माहिती कोडमध्ये रूपांतरित करण्यात येते. इथून पुढे नासाच्या ट्रॅकिंग आणि डेटा रिले सॅटेलाइटमधून न्यू मेक्सिकोमधील ग्राउंड अँटेनाद्वारे ह्युस्टनमधील मिशन कंट्रोलकडे पाठवली जाते. सर्वात शेवटी ती संबंधित काउंटी क्लर्ककडे पाठवली जाते.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोघंही टेक्सासचे रहिवासी आहेत. मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी टेक्सासमधील निवडणूक अधिकारी नासाबरोबर काम करतात. सॅटेलाइट फ्रिक्वेन्सीद्वारे मतपत्रिका अंतराळवीरांना पाठविल्या जातात. मतपत्रिका पाठविण्यापूर्वी ती अंतराळवीरांना सोइस्कर होईल अशा पीडीएफ स्वरूपात तयार केली जाते. चाचणी म्हणून एक पासवर्ड असलेली मतपत्रिका आधी पाठविली जाते. त्यानंतरच मुख्य मतपत्रिका पाठविली जाते, अशी माहिती निवडणूक कार्यालयाचे प्रवक्त्यांनी एनबीसीला न्यूजला ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT