Shreya Maskar
हिमाचल प्रदेशातील जीभी हे एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. हिवाळ्यात या ठिकाणाचे सौंदर्य आणखी वाढते.
हिमाचल प्रदेशातील जिभी या ठिकाणाला 'मिनी थायलंड' म्हटले जाते. हिरवीगार दऱ्या, उंच पर्वत यांच्या सौंदर्याची तुम्हाला भुरळ पडेल.
जीभी हे एक सुंदर ठिकाण जिभी धबधबा, देवदारची घनदाट जंगले आणि तीर्थन नदीसारख्या प्राचीन नद्यांसाठी ओळखले जाते.
जंगल ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी जिभी धबधब्याला भेट देणे एक उत्तम पर्याय आहे. जीभी धबधबा फोटोशूटसाठी बेस्ट आहे.
जिभी हे तीर्थन व्हॅलीचा एक भाग आहे. येथे निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतो.
जीभी येथील ट्री हाउस परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे पर्यटकांना अनोखा अनुभव घेता येतो. हनिमूनसाठी देखील हे बेस्ट लोकेशन आहे.
जिभी हे मासेमारी आणि पक्षी निरीक्षणासारख्या निसर्गरम्य उपक्रमांसाठी एक उत्तम ठिकाण आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.